पोस्ट्स

आठवणी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बोल्ट्या : आनंददायी सहवास

इमेज
बोल्ट्या : एका मुक्या जीवाचा आनंददायी सहवास  बोल्ट्या -  मायाळू,  खूर.. खूर.. जीव बोल्ट्या फक्त आगाऊ, खडूस, हावरट, खुरखुर करणारा आणि ओरखडे काढणारा असाच नव्हता. त्याच्या स्वभावाच्या या सगळ्या खोडकर छटांपलीकडे तो एक अतिशय प्रेमळ, खेळकर, दयाळू आणि संवेदनशील जीव होता. त्याच्यात एक निरागस बालपण होतं, मायेचा ओलावा सामावलेला होता. त्याला बोलता येत नव्हतं, मात्र त्याच्या वागण्यातून तो जे काही सांगायचा, ते समजून घेण्यासाठी शब्दांची गरजच नव्हती. बोल्ट्याच्या दिवसाची सुरुवातच मुळी त्याच्या मित्राला उठवण्यापासून व्हायची. सकाळ झाली की त्याला त्याच्या बास्केटमधून बाहेर काढताच तो टुन्नकन उडी मारुन पळत सुटायचा आणि प्रतीक झोपलेल्या बेडवर उड्या मारायचा प्रयत्न करायचा. तीन-चार प्रयत्नात तो वर जाण्यात यशस्वी व्हायचा. स्वतःच्या खाण्यापिण्यापेक्षाही आधी आपल्या मित्राची आठवण यायची. तो सरळ त्याच्याजवळ जायचा. आधी त्याच्या भोवती गोल-गोल फिरायचा. जणू काही, 'उठी उठी गोपाळा' किंवा 'जागो पप्पू प्यारे' नाही तर मग 'सुबह हो गयी मामू' असं काही तरी तो नक्कीच म्हणत असावा. श...

🐇 बोल्ट्याच्या करामती 🐇 रखवाला ||१७

इमेज
     आमचा बोल्ट्या केवळ नसाना, उनाड, हावरा असाच नव्हता, तो एक जबाबदार मालक सुद्धा होता. मालक कुणाचा काय? आमचाच!!  तो आम्हाला, तो आमचा मालक आणि आम्ही त्याचे पाळीव, अशीच वागणूक द्यायचा. मी भाजी निवडायला घेतली की हा काय करायचा माहितीये? समोर मुळासकट टाकलेली भाजी तशीच ठेवायचा, तिला तोंडही लावायचा नाही. मी निवडून, स्वच्छ करून ठेवलेली कोथिंबीर, मेथीची पानं, त्याला हवे असायचे. जणू काही मी त्याच्यासाठीच भाजी निवडत आहे, असाच त्याचा समज होता. नाक फुगवून, मिशा हलवत तो निवडलेली भाजीच माझ्या कडे बघत बघत खायचा. ' छान निवडली हं भाजी अशीच निवडून देत जा ' म्हणत असावा असं त्याचे डोळे बघून वाटायचं.  मी माझं काम आवरून जरा पुस्तक घेऊन बसले की स्वारी हजर ! टुणूक टुणूक उड्या मारत येणार, माझ्या  जवळ घुटमळणार.समोर पसरून देणार.  आपल्या इवल्या दोन पंजांनी माझा हात ओढून घेऊन लाड करून घेण्याचा हट्ट. त्याच्या मऊ मऊ केसांवरून हात फिरवला नाही तर मग धिंगाणा ठरलेलाच! पुस्तकावर उडी मारून बसणे, माझ्या ओढणीचा कोपरा कुरतडणे, आणि रागाने शेपटी जमीनवर  आपटणे - थप थप थ...