छाया बेले – साहित्य प्रवास
छाया बेले या सामाजिक भान जपणाऱ्या आणि स्त्री-अस्तित्व, आत्मसन्मान, समता व सामाजिक परिवर्तन या विषयांवर सातत्याने लेखन करणाऱ्या समकालीन मराठी साहित्यिक आहेत. कविता, कथा, कादंबरी अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी उल्लेखनीय लेखन केले असून त्यांच्या साहित्याला राज्यस्तरीय मान्यता, पुरस्कार आणि शैक्षणिक अभ्यासाचा सन्मान लाभलेला आहे. त्यांचे लेखन हे केवळ अभिव्यक्ती नसून सामाजिक जाणीवेचा सातत्यपूर्ण दस्तऐवज आहे.
प्रकाशित साहित्य
१) लढाई अस्तित्वाची (कविता संग्रह) – १ जुलै २०१२
२) चकवा (कथा संग्रह) – १४ एप्रिल २०१५
(राज्य ग्रंथ निवड समितीने शासनमान्य ग्रंथालयाकरिता शिफारस – मुख्य यादी क्र. ९२०/२०१५)
३) घर याचे ह्रदयी माझ्या (कविता संग्रह) – १ जानेवारी २०१८
४) वैशाख वणवा (कथा संग्रह) – २८ नोव्हेंबर २०१८
(म.सा.प. पुरस्कार, सिन्नर)
५) फरफट (कादंबरी) – २०२०
(सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुरस्कार)
६) हॅपी होमच्या भिंतीआड (कविता संग्रह) – १४ जुलै २०२३
७) पारबता (कादंबरी) – १० नोव्हेंबर २०२४
पुरस्कार
१) उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार – २०१३ (राज्यस्तरीय)
मुक्तासाळवे सार्वजनिक वाचनालय, उदगीर, जि. लातूर
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार – २०१४ (राज्यस्तरीय)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूर
३) गुरु रविदास साहित्य पुरस्कार – २०१५ (राज्यस्तरीय), नांदेड
अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषद
४) क्रांतीगुरू लहुजी साळवे पुरस्कार – २०१६ (राज्यस्तरीय), नांदेड
अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य
५) आद्यक्रांतिवीर गुरुवर्य लहुजी साळवे साहित्य साधना पुरस्कार – २०१८ (राज्यस्तरीय)
श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, गुंधा, ता. लोणार, जि. जालना
६) विद्रोही कवयित्री पुरस्कार – २०१९ (राज्यस्तरीय)
अखिल भारतीय मुक्ता साळवे साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे
७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार – २०१९, लातूर
८) महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, शाखा सिन्नर – २०१९
(सर्वोत्कृष्ट कथासंग्रह – वैशाख वणवा)
९) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अध्यासनचा राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार – २०२२
(फरफट कादंबरी)
१०) कवी भुजंग मेश्राम उलगुलान राज्यस्तरीय पुरस्कार – २०२३
अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद, नांदेड
(हॅपी होमच्या भिंतीआड)
११) सीतासखा स्मृती शिवांजली साहित्य सन्मान – २०२४
शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाळकवाडी-पिंपळवाडी
(हॅपी होमच्या भिंतीआड)
१२) अण्णाभाऊ साठे साहित्य व कला अकादमी, नागपूर
१३) शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार – २०२३-२०२४
(हॅपी होमच्या भिंतीआड)
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवनव्रती पुरस्कार – २०२४ (राज्यस्तरीय)
१४) अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य
साहित्य गौरव पुरस्कार – २०२५
१५) प्रसाद बन ग्रंथ गौरव पुरस्कार – २०२५
(हॅपी होमच्या भिंतीआड)
संशोधन व शैक्षणिक संदर्भ
नांदेड विद्यापीठात “छाया बेले यांचे समग्र साहित्य” या विषयावर PhD सुरू आहे.
अमरावती विद्यापीठात “मराठवाड्यातील दहा आंबेडकरी कथाकार” या विषयांत कथांवर PhD पूर्ण.
MGM विद्यापीठात लढाई अस्तित्वाची या कविता संग्रहाचा समावेश.
नियतकालिके व प्रकाशन
१) अस्मितादर्श
२) अक्षरगाथा
३) अक्षरगणगोत
४) साहित्य समन्वय
५) परिवर्तनाचा वाटसरू
६) मिळून साऱ्याजणी
तसेच अनेक दैनिके व दिवाळी अंकांत कथा, कविता व लेख प्रकाशित.
इतर सहभाग
आकाशवाणी नांदेड व परभणी केंद्रावरून काव्यवाचन
अनेक साहित्य संमेलनांत निमंत्रित कवी म्हणून सहभाग
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा