डॉ.मथुताई सावंत : एक एक चिंतनशील लेखिका
डॉ. मथुताई सावंत : एक चिंतनशील लेखिका -------------------- छाया बेले, नांदेड. आयुष्यात काही व्यक्ती अशा भेटतात की, त्यांचा व आपला प्रत्यक्ष सहवास किती काळ आहे, हे महत्त्वाचं नसतं. काही क्षणांच्या भेटीतच एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा आपल्या मनावर ठसा उमटून जातो. असंच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक, प्रा. डॉ. मथुताई सावंत. त्यांच्याशी पहिली ओळख ही त्यांच्या कथासंग्रहातून झाली. आपल्या काळातील व आपल्या भागातील स्त्रीलेखिकांचा शोध घेत असताना मथुताईंचा 'तिची वाटच वेगळी ' हा कथासंग्रह हाती आला. अनेक लेखकांची अनेक पुस्तकं वाचनात आली. सगळेच काही लक्षात राहत नाहीत; मात्र 'तिची वाटच वेगळी' हा कथासंग्रह अंतःकरणात कुठेतरी साठून राहिला. याचं कारण असं की, या कथांमधून ताईंनी मराठवाड्यातील स्त्रीजीवनाचं वास्तव एवढ्या तळमळीनं, जीवाच्या जिव्हाळ्यानं मांडलं आहे की ते थेट अंतःकरणाला भिडतं. तेव्हापासून मथूताईंना भेटण्याची आतुरता लागून होती. ती संधी प्रसाद बन साहित्य पुरस्काराच्या निमित्ताने आली. तो क्षण अविस्मरणीय होता. जेवढी सच्चाई ताई...