धगितून चालते ती | पुस्तक परिचय
धगीतून चालते ती | पुस्तक परिचय स्त्री ही साहित्य, कला यांच्या कायम केंद्रस्थानी राहिलेली आहे. अगदी अनेक महाकाव्य सुद्धा स्त्री या वर्तुळाभोवतीच रचली गेली आहेत . मात्र तिला कोणत्या स्वरूपात मांडले गेले हा मुख्य मुद्दा आहे. कळलावी, घरफोडी, कुरघोडी करणारी, कुलटा, शिकलेली असेल तर ती स्वैर वागणारी , कुठल्याही जबाबऱ्या न स्विकारणारी अशाच प्रतिमा व प्रतिकातून स्त्री साहित्यातून भेटत आली आहे. मात्र तिला खऱ्या रूपात समोर आणणे, तिचा संघर्ष, जिद्द, जिवनजाणीवा, जगण्यावरील तिची निष्ठा , तिचा स्वाभिमान , जिवनाला भिडण्याची उर्मी , तिच्याठायी असलेलं सत्व साहित्याच्यातून मांडणे इथल्या पुरुष सत्ताक मानसिकतेच्या साहित्यिकांना कधीच जमलं नाही. मात्र साहित्य सम्राट, अण्णाभाऊ साठे यांनी स्त्रियांना सन्मान देत तिला तिच्या खऱ्या स्वरूपात मांडले. नायिकांना नायका एवढ़च महत्त्व , तेवढंच महत्त्वाचं स्थान, मान त्यांनी आपल्या साहित्यातून दिला. अण्णाभाऊनी खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या बाबत...