बाई पेरते हिरवळ रखरखत्या उन्हात
बाई पेरते हिरवळरखरखत्या उन्हात.. धन्याच्या गळ्यभोवती आवळलेले फास पाहून बोरी बाभळीचंही काळीज उलथं पालथं होतं शिवार सगळा पांगुळतो वावरातले दगडमाती रडतात धाय मोकलून लकवा मारलेला वारा नेतो खोपटावरचं पाचट उडवून तवा बाई घेते जू खांद्यावर.. बैलासंग राबते रानात.. कुंदाळलेलं शेत काढते खणून.. धसकटानं कापलेल्या पायावर फिरवते जखमजोडी.. जखमांना अंगाखांद्यावर वागवीत लावतेच पात कडेला डोक्यावर लाकडाचा भारा.. बगलत वासराचा चारा.. काखोटी लेकरू धरून चालते घराची वाट.. वल्ल्या लाकडाची पेटवते चुल अन् भाजते आयुष्याची भाकर बाई, पोराबाळासाठी.. रक्ताळलेल्या हातानीं भेगाळलेलं सारवन घेते लिपून अन् रेखते रांगोळी दारात... बाई पेरते हिरवळ रखरखत्या उन्हात.. ©®छाया बेले✒