पोस्ट्स

चोळी कादंबरी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

परिवर्तनाचा विचार देणारी साहित्यकृती - चोळी | पुस्तक परिचय

इमेज
परिवर्तनाचा विचार देणारी साहित्यकृती - चोळी       सुप्रसिद्ध लेखक, चित्रपट दिग्दर्शक सुरेश कृष्णाजी पाटोळे यांची 'चोळी' ही कादंबरी बऱ्याच प्रतीक्षेनंतर हाती आली व जराही उसंत न घेता कादंबरी वाचून काढली.  याचं कारण म्हणजे विषयाचं नाविन्य, वाचकाला खिळवून ठेवण्याची लेखकाची खुमसदार वर्णन शैली , घटना , प्रसंगांना असणारी गती,परिवर्तनवादी विचारांची सजगतेने केलेली मांडणी. लेखक सुरेश पाटोळे यांच्या लिखाणाचे हे सगळेच गुणविशेष घेऊन 'चोळी' ही कादंबरी वाचकांच्या भेटीला आली आहे. भारतीय समाजाला पोखरून खिळखिळ्या करणाऱ्या अशा अनेक रूढी परंपरा आजही समाजात चालू आहेत, ज्याने स्त्रियांचा आत्मसन्मान पायदळी चिरडला जातो.खेदाची बाब अशी की ज्यांच्या बाबतीत हे सगळं घडतं,  आपलं शोषण होत आहे हे त्यांच्या ध्यानीमनीही येत नाही. या बाबतीत कसलीच खंतही वाटत नाही. याला कारण म्हणजे शोषण अंगवळणी पडलेले असते. आपलं शोषण होत आहे हेच त्यांना माहीत नसते. आपल्या आजूबाजूला हे घडत असताना सरावाने निगरगट्ट झालेला समाज त्याकडे कधी सहज, तर कधी मुद्दाम कानाडोळा करतो . मात्र संवेदनशील मनाच्या लेखक...