पोस्ट्स

धावतेय मी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मुक्तीच्या शोधात | मराठी कविता

इमेज
धावतेय मी आयुष्याच्या धावपट्टी वर नगण्य अस्तित्वाची भारवाही होवून... निद्रिस्त जाणिवांना आलेलं आत्मभान धडका घेत राहण भिंतीवर.. शोध घेत राहतं उजेडांच्या कवडश्यांचा या अंधारयुगाची खंत सलते जाणिवांना अदृश्य शृंखलाच्या  कुठल्या निखळून पडल्याचे भास  होताहेत मनाला अस्वस्थतेच्या कृष्णविवरात गुदमरतोय जीव.. आतून एक हलकासा आक्रोश  कानावर येतोय मुक्ती... मुक्ती... मुक्ती !! छाया  बेले.