पोस्ट्स

निसर्ग लेबलसह पोस्ट दाखवत आहे

माय गं धरित्री | मराठी कविता

इमेज
कृषी दिनाच्या निमित्ताने  माय गं धरित्री  रहाय तू पोटुशी  जलमाला घाल कुणब्याची खुशी  डोळ्यात उतरो  सुखाची गं आस पिढ्यानपिढ्याचा सरो वनवास  घरी दारी नांदो  बाई आबादानी आटू दे गं आता  डोळ्यातलं पाणी  बांधाच्या झाडाचा  मिळू दे विसावा  धन्याच्या गळ्याला फास न कसावा  खळ्याला त्याच्या  येवो बरकत  खिल्लारी जोडी  राहो डिरकत  @छाया बेले.

बोल्ट : घरातील पहिला दिवस | बालकथा-भाग २

इमेज
आमच्या घरात आलेले दोन इवलेसे जीव तो आल्यानंतर पहिल्या दिवशी आम्ही सगळे त्याच्याकडे कौतुकाने पाहत होतो. निसर्गातील एक गोड, इवलासा, निरुपद्रवी जीव म्हणूनच त्याच्याकडे पाहत होतो. त्याच्या प्रत्येक हालचालीत आम्हाला काहीतरी नवीन, गंमतीदार आणि पाहत राहावंसं वाटणारं दिसत होतं. प्रतीकने, म्हणजे माझ्या मुलाने, त्याच्यासाठी अक्षरशः शहरभर फिरून हिरवं, मऊ गवत आणलं. गाजरं आणली. त्याला हाताने खाऊ घातलं. आपल्याकडे आलेल्या पाहुण्याचं जसं लाडाने स्वागत करावं, तसंच त्याचं स्वागत सुरू होतं. पण तो मात्र आमच्याजवळ यायला चांगलाच कचरत होता. हातात गवत दिसलं की ते हिसकावून घ्यावं तसं घेऊन घरभर इकडून तिकडे पळत सुटायचा. मग आमच्यापासून सुरक्षित अंतरावर जाऊन बसायचा आणि निवांतपणे गवत खायचा. आम्ही त्याच्याकडे बघत बसायचो आणि त्याला आमच्याशी मैत्री करण्यासाठी अजून किती दिवस लागतील याचा अंदाज घ्यायचो. त्याच्या कानांची हालचाल, गवत खातानाची लगबग, अचानक दचकून पळणं, एका जागी स्थिर बसून आजूबाजूला पाहणं... त्याच्या सगळ्याच हालचालींचं आम्हाला कौतुक वाटत होतं. युट्युबवर त्याची काळजी कशी घ्यावी, त्याला काय ख...

मराठी कथा / पेरणी

इमेज
।।  पेरणी ।। रोहिणी नक्षत्र थोडं झिरपलं. शेतकऱ्याला पेरणीचे वेध लागले. सगळीकडे लालबुंद फुलासारखे किडे फिरू लागले. बाया सगळ्या त्यांना मृग घेऊन येणारे किडे म्हणून हळद कुंकू लावून पाऊस पडू दे म्हणून पाया पडू लागल्या . "पाऊस पडतो मिरगा आधी रोहिणीचा पाळणा हलतो भावा आधी बहिणीचा" पहाटे जात्यावर दळताना बाया ओव्या म्हणू लागल्या. सगळे शेतकरी  मृगाचा पाणी पडताच पेरणी करावी म्हणून सगळी तयारी करून बसले होते. सटवा आपली तीन गुंठे जमीन पेरण्यासाठी घरातील डाळ दाना विकून बी -बियाणे  घेऊन आला. तर  नामूनं एकरभराच्या पेरणीसाठी बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून बियाणं आणलं. शेवंता बरेच दिवस आदळआपट करीत राहिली . मात्र तिलाही कळत होतं दुसरा कुठलाही पर्याय नाही. म्हणून मग काही दिवसांनी शांत झाली . महादुला पाच एकराची पेरणी करायची होती. म्हणून त्यांन सोयाबीन न वीकता तसंच लावून ठेवलं होतं पेरणीसाठी. ते सोयाबीन कुंभाराच्या गाढवावर लादून सावकाराकडं घेऊन गेला सावकारांन वजन काटा केला. आता भाव पडलाय म्हणून अर्ध्या किमतीत सोयाबीन घेतलं. महादुला हळूहळू आपला जीव कोणीतरी काढून घेत...