पोस्ट्स

पालकत्व लेबलसह पोस्ट दाखवत आहे

हाका चिमुकल्या मनाच्या !!

इमेज
मुलांना नेमकं काय देतोय आपण? — आनंदी जीवन की तणावग्रस्त जगणं? समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित होत आहे. त्यात एक चिमुकली मुलगी हातात बिअरची बाटली पकडावी तशी एक बाटली पकडून आपल्या व्यस्त दिनक्रमाविषयी राग व्यक्त करते. तिचा अभिनय सुंदर वाटतो म्हणून अनेक जण हा व्हिडिओ पाहतात आणि पुढे पाठवतात. मात्र, त्या अभिनयामागे दडलेली तगमग कोणाच्या लक्षात येते का? किंवा ती लक्षात आली तरी आपण त्यासाठी काय करू शकतो, असा विचार कोण करतो? आजकाल हे आवश्यकच आहे, असं म्हणून दुर्लक्ष करणारेही अनेक आहेत. ही झाली पहिली घटना. दुसरी घटना माझ्या शेजारी राहणाऱ्या सुमितची. आठवीत शिकणारा सुमित काल आपल्या आईला म्हणाला, “तुम्ही मला जन्म देऊन क्राइम केलाय. तुमचा प्रॉब्लेम काय आहे? मी जगू नको का?” कारण एवढंच होतं की त्याची आई त्याला अभ्यासावरून बोलत होती. सुमितची आई माझ्याजवळ येऊन रडत होती. ती म्हणाली, “ताई, काय चुकलं असेल हो माझं? सुमित असं बोलला. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी एवढं जिवाचं रान करते. घरात राबते, नोकरी करते. लेकराचे जे जे हट्ट असतात ते सगळे पुरवते. मग कुठे कमी पडले, तेच कळत नाही.” ती बराच व...