पोस्ट्स

पुस्तक समीक्षा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नामांतराच्या इतिहासातील उपेक्षित शौर्याचा इतिहास : नामांतर शहीद पोचिराम कांबळे

इमेज
नामांतराच्या इतिहासातील उपेक्षित शौर्याचा इतिहास : नामांतर शहीद पोचिराम कांबळे नामांतर लढ्यातील उपेक्षित शौर्याचा इतिहास : ' नामांतरशहीद पोचिराम कांबळे ' ------------------------------------------------ ' सत्य कहाणी पोचीरामजींची  मरणाला नाही भिणार  तोडा अथवा जाळा मजला  जयभीम नाही सोडणार..! '         नामांतर लढ्यातील शहीद पोचीराम कांबळे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवाप्रती असलेली निष्ठा वरील ओळीतून प्रकट होते. ' जय भीम ' हे दोन शब्द नाहीत तर न्याय, समता, मानवता, यांचं प्रतिक आहे. पोचीराम कांबळे  यांचं बलिदान  याच दोन शब्दांच्या समर्थनार्थ होते .        इतिहासातील काही घटितं हे केवळ घटनांची नोंद नसतात. त्यामागील दोन्ही बाजूच्या विचारधारा, निष्ठा, उद्देश याचा उलगडा करतात.         मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन हा असाच एक धगधगता  इतिहास आहे. डॉ. मारोती कसाब यांनी लिहिलेला समाजमनातील आंबेडकरी जाणीवांचा वेध घेणारा, ' नामांतर शहीद पोचिराम कांबळे ’ हा ग्रंथ या आंदोलनाकडे न...

चऱ्हाट: एक अभिप्राय

इमेज
चऱ्हाट : एक दृष्टिक्षेप डॉ. बाबुराव गायकवाड यांचा नवीन कथासंग्रह "चऱ्हाट" नुकताच वाचण्यात आला. बाबुराव गायकवाड यांच्या लिखाणातून समाजाने व साहित्याने ज्यांना दुर्लक्षित ठेवले, ज्यांची दखल घेतली नाही किंवा घ्यावीशी वाटली नाही, अशा उपेक्षित वर्गाचं जीवनदर्शन घडतं. लेखक आजूबाजूला घडलेल्या घटनांना कथारूप देऊन समाजाचं वास्तव रूप वाचकासमोर ठेवतात. कधी पाहिलेल्या तर कधी अनुभवलेल्या घटनांचा समावेश त्यांच्या लेखनात येतो. कुठेही काल्पनिक किंवा रंजनात्मकता त्यांच्या साहित्यात दिसून येत नाही. हीच तर त्यांच्या साहित्याची ओळख आहे, त्यांच्या लेखनाचे हे वेगळेपण व वैशिष्ट्य आहे. लेखक समाजाच्या ज्या स्तरातून आले आहेत आणि त्यामुळे त्यांना करावा लागलेला संघर्ष, अनेक अडचणींवर मात करीत स्वतःला घडवत जाणे, त्यातून साकारलेलं विस्तृत अनुभवविश्व, त्यामुळे मिळालेला समाजाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन, उपजत अंगी असलेली संवेदनशीलता व अनुभवाला शब्दरूप देण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिभा, त्याचबरोबर साहित्यावरील व माय मराठीवर असलेली निष्ठा. यामुळे डॉ. बाबुराव गायकवाड यांच्या नावावर आतापर्यंत तब्बल ...