🐇 बोल्ट्याच्या करामती 🐇 ये मेरा इलाक़ा है !!भाग -११
बोल्ट्याचा सिंहासनासाठी निकराचा लढा बोल्ट्याचं एक तत्व होतं - _या घरात मी एकटाच राजा._ दुसऱ्या कोणाचीही त्याला अजिबात गरज नव्हती, आणि कोणाचंही या घरात येणं त्याला मान्य नव्हतं काही कारणामुळे थम्परला परत नेऊन सोडावं लागलं. घरात एकदम शांतता. बोल्ट्या आता एकटा पडेल, त्याला करमणार नाही, अशी आम्हाला काळजी वाटायला लागली. माणसांचं हृदय बघा, सशालाही एकटं वाटेल असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही एका महा-भयंकर चुकीचा निर्णय घेतला. बोल्ट्यासाठी एक 'दोस्त' आणायचा. नवीन दोस्त आणला तर खरंच दोस्तासारखा नव्हता, पैलवानासारखा होता. बोल्ट्याच्या दुप्पट आकार, धष्टपुष्ट शरीर, अगदी शुभ्र पांढरा रंग, अंगावर मेंढीसारखी मऊमऊ दाट फर, आणि एकदम शांत, सज्जन वाटणारा चेहरा. आम्हाला वाटलं, आता काय, दोघं मिळून घरभर पळतील, खेळतील, मस्ती करतील. घरात दोन ससे असतील तर किती छान दिसेल! पण आम्ही एक गोष्ट विसरलो होतो. नवीन आणलेला पाहुणा सुद्धा Male होता. आणि आमचा हा 'मेलं' सुद्धा... मग काय, झालंच वेगळं! जसा आम्ही त्या शुभ्र पैलवानाला बोल्ट्याच्या खोलीत सोडला, क्षणाचाही विलंब न करता बोल...