🐇 बोल्ट्याच्या करामती 🐇 लुकाछुपी!! भाग ७
बोल्ट्याची ब्लँकेटमधली लुक्काछुप्पी बोल्ट्याच्या मजेदार किस्स्यांपैकी अजून एक किस्सा सांगते बरं का! आमच्या घरात एक गंमत आहे. घरात कोणीही नवीन कपडे घातले की आमचा बोल्ट्या सगळ्यात जास्त खुश होणारा! तसा घरात कोणतीही नवीन वस्तू आली, किंवा सणवार असेल, कुठला खुशीचा माहौल असेल, तर घरात सगळ्यात जास्त आनंद कोणाला होतो माहितीये? तर आमच्या बोल्ट्यालाच! मी जर नवीन साडी नेसले ना, की झालंच! हा गोल गोल फिरणार, उंच उंच उड्या मारणार आणि मला पुरतं भंडावून सोडणार! कधी माझ्या साडीभोवती प्रदक्षिणा घालणार, तर कधी साडीचं टोक तोंडात पकडून हलकेच ओढणार! जणू म्हणणार, "वा! काय छान साडी आहे! मला पण दाखव, मला पण दाखव!" पण कपड्यांच्या आवडीबद्दलचा सगळ्यात भारी किस्सा म्हणजे थंडीच्या दिवसातला! थंडी वाजली की हा काय करायचा माहितीये? घरात जो सगळ्यात मऊ, लुसलुशीत ब्लँकेट असेल, त्यात हा हळूच शिरायचा! आणि मग आतल्या आतच... इकडून तिकडे, तिकडून इकडे फिरायचा! तेही असा काही बहाणा करायचा की बघणाऱ्याला खरंच वाटावं, अरेरे! हा बिचारा चुकून आत शिरलाय आणि आता त्याला...