🐇 बोल्ट्याच्या करामती 🐇 जय - वीरू की जोडी !!भाग १२
तेजू आणि बोल्ट्याची मैत्री! सुरुवातीला तेजू आणि बोल्ट्याची मैत्री होती का? अजिबात नाही! दोघेही एकमेकाला बघून सैरावैरा पळायचे. जसा उंदीर मांजराला घाबरतो तसेच! तेजू जरा जवळ गेला की बोल्ट्या... खुर्रर्र... खुर्रर्र... असा आवाज काढून टुणकन उडी मारून पळून जायचा. तेजूने त्याला अलगद उचलले तरीही हा पठ्ठ्या खाली उडी मारायचा. का बरं? कारण बोल्ट्याला तेजू माहितच नव्हता! बोल्ट्याच्या डोक्यात एक छोटंसं कळपाचं गणित होतं. "हेच दोन-तीन लोक माझं अख्खं जग आहे, माझा परिवार आहे." आणि त्यात अचानक हा लांबूडका नवीन प्राणी कुठून आला? तेजू म्हणजे आपल्या कळपात घुसलेला पाहुणाच वाटायचा त्याला. बोल्ट्या मुळात थोडा लाजरा-बुजरा, पटकन कोणात न मिसळणारा. त्यामुळे तो तेजसला मुद्दाम घाबरवायचा. तेजस घरात आला की बोल्ट्या त्याच्या अंगावर धावून जायचा. छाती फुगवून सांगायचा, "बघ, मी किती भयंकर आहे! माझ्या वाटेला जाऊ नकोस!" पण आपला तेजू काही घाबरला नाही. त्याने एक युक्ती केली. मैत्रीची युक्ती! तो हळूच बोल्ट्याजवळ जायचा. त्याच्या आवडीचा गाजराचा तुकडा, हिरवीगार पा...