पोस्ट्स

भारतीय इतिहास लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भाग २ : ऋत विरुद्ध निऋती - वैचारिक संघर्ष व सत्ता संघर्ष

इमेज
भाग २ : ऋत विरुद्ध निऋती - वैचारिक संघर्ष सत्ता संघर्ष  वैदिक वाङ्मयाचा अभ्यास करताना ‘ऋत’ ही संकल्पना केंद्रस्थानी येते. ऋत म्हणजे केवळ सत्य किंवा धर्म नव्हे, तर संपूर्ण विश्वाला धारण करणारी एक व्यवस्था. सूर्याने वेळेवर उगवणे, ऋतूंचे चक्र नियमितपणे फिरणे, नद्यांनी आपला मार्ग न सोडणे, यज्ञ योग्य पद्धतीने पार पडणे आणि समाजातील प्रत्येक वर्णाने आपले कर्तव्य पाळणे म्हणजे ऋत होय. ऋग्वेदामध्ये वरुण हा ऋताचा रक्षक मानला जातो. तो आकाशातून सर्व जगावर लक्ष ठेवतो आणि जो कोणी ऋताचे उल्लंघन करेल त्याला शिक्षा करतो. या अर्थाने ऋत ही एक दैवी, नैसर्गिक आणि नैतिक व्यवस्था म्हणून सादर केली जाते. पण या व्यवस्थेच्या नेमक्या विरुद्ध टोकाला उभी केली जाते ती म्हणजे निऋती. शब्दाच्या व्युत्पत्तीचा विचार केला तर ‘निर् + ऋती’ म्हणजे ऋताचा अभाव, ऋतापासून दूर जाणे, ऋताचा नाश. त्यामुळे निऋती म्हणजे अराजक, अनियम, असत्य आणि विनाश. जिथे ऋत आहे तिथे समृद्धी, सुव्यवस्था आणि शांती आहे, आणि जिथे निऋती आहे तिथे दुष्काळ, मृत्यू, रोगराई आणि भय आहे, असे चित्र वैदिक साहित्यात उभे केले जाते. अथर्ववेदात तर निऋती...

निऋती : मातृसत्ताक आदिमाता - भाग १

इमेज
निऋती : मातृसत्ताक आदिमाता - भाग १ भारतीय प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करताना आपण अनेक देवता, संकल्पना आणि प्रतीकांच्या भोवऱ्यात अडकतो. या देवता केवळ धार्मिक श्रद्धेच्या चौकटीत निर्माण झालेल्या नसून, त्या त्या काळातील समाजरचना, सत्ता-संबंध, आर्थिक व्यवस्था आणि सांस्कृतिक संघर्ष यांचे प्रतीक असतात. निऋती ही त्यातीलच एक महत्त्वाची, पण दीर्घकाळ दुर्लक्षित आणि चुकीच्या अर्थाने समजली गेलेली संकल्पना आहे. निऋतीचा उल्लेख वैदिक वाङ्मयात प्रामुख्याने अशुभ, विनाशकारी, संकटदायी आणि टाळण्याजोगी शक्ती म्हणून केला जातो. ऋग्वेद, अथर्ववेद आणि ब्राह्मणग्रंथांमध्ये निऋती ही अशी सत्ता मानली जाते की जिच्यापासून दूर राहावे, जिला यज्ञांद्वारे शांत करावे किंवा जिला प्रतीकात्मकरीत्या समाजाच्या सीमेबाहेर हाकलावे. तिचे नाव उच्चारताना भीती, अनिश्चितता आणि अपशकुन यांची छाया दिसून येते. मात्र प्रश्न असा आहे की, एखादी देवता इतकी भयकारी का ठरवली गेली? ती सुरुवातीपासूनच अशुभ होती, की तिला अशुभ ठरवण्यात आले? धर्मग्रंथ हे केवळ अध्यात्मिक उपदेशांचे संकलन नसतात. ते त्या समाजाच्या सामूहिक स्मृतीचे, संघर्षांचे आणि...

गौतम बुद्धाच्या काळापर्यंत काही प्रमाणात टिकून होती मातृसत्ताक संस्कृती!!

इमेज
        गौतम बुद्धाच्या काळापर्यंत कशीबशी टिकून राहिलेली मातृसत्ताक संस्कृती पुढे पूर्णपणे लोप पावली. इतकेच नव्हे, तर तिचे विकृतीकरण करून तिला समाजजीवनातून हद्दपार करण्यात आले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही वैश्विक जीवनमूल्ये जोपासणारी मातृसत्ताक संस्कृती काळोखात लोटली गेली आणि तिच्या जागी विषमतेवर, भेदाभावावर आणि शोषणावर आधारित पुरुषसत्ताक व्यवस्था प्रस्थापित करण्यात आली. या व्यवस्थेने स्त्रीचे माणूसपणच नाकारले. तिचे सगळे हक्क आणि अधिकार हिरावून घेऊन तिला उंबऱ्याच्या आत कैद केले गेले. इथूनच स्त्रीचे जगणे कमालीचे कठीण होत गेले. तिला स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार राहिला नाही. बालविवाह आणि लहान मुलींचे वयस्कर पुरुषांशी लग्न लावून देण्याच्या प्रथेमुळे अगदी तरुण वयातच मुली विधवा होऊ लागल्या. अशा विधवा मुलींना सांभाळण्याची तयारी माहेरच्यांची किंवा सासरच्या मंडळींची नसायची. त्या काळात स्त्रीचा पुनर्विवाह ही संकल्पनाच अस्तित्वात नसल्यामुळे, या परिस्थितीमधून 'सतीप्रथा' जन्माला आली. पतीच्या निधनानंतर स्त्रीची इच्छा नसतानाही, तिला जबरदस्तीने चितेवर बसवून तिच...