पोस्ट्स

भारतीय संस्कृतीचा इतिहास` लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भाग ३ : निऋती - मातृदेवतेचे मृत्यूदेवतेत झालेले रूपांतर.

इमेज
भाग ३ : निऋती - भूमी आणि मृत्यूची देवता निऋतीला समजून घ्यायचे असेल तर तिचे दोन सर्वात महत्त्वाचे संबंध समजून घ्यावे लागतात. एक भूमीशी आणि दुसरा मृत्यूशी. वैदिक ग्रंथांमध्ये या दोन्ही गोष्टी तिला जोडल्या आहेत आणि दोन्ही ठिकाणी तिला अशुभ ठरवले आहे. पण हेच अशुभत्व तिच्या मूळ रूपाची ओळख करून देते. पहिला संबंध आहे भूमीशी. ऋग्वेदात आणि नंतरच्या ब्राह्मण ग्रंथांमध्ये निऋतीला ‘भूम्या: अधिपत्नी’ म्हटले आहे. म्हणजे भूमीची स्वामिनी. वरवर पाहता हा सन्मान वाटेल, पण वैदिक ऋषींच्या दृष्टीने भूमी म्हणजे काय होती? आर्य हे मूलतः पशुपालक होते. त्यांच्यासाठी भूमी ही चराऊ कुरणे होती, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग होता.उलट येथील मूळ शेतकरी समूहांसाठी भूमी हीच सर्वस्व होती. ती माता होती, तीच अन्न देते, तीच आश्रय देते. ती विकता येत नाही, ती फक्त पूजनीय असते. म्हणून जेव्हा आर्यांनी निऋतीला भूमीची देवता म्हटले, तेव्हा त्यांनी एका वेगळ्या अर्थव्यवस्थेची देवता म्हणून तिची नोंद केली. शेतीवर जगणाऱ्या, भूमीला आई मानणाऱ्या लोकांची देवता. पण आर्यांच्या यज्ञ-संस्कृतीत भूमीला असे मातृत्व देणे ह...