समज हरवलेल्या स्त्रीयांची गोष्ट | मराठी लेख
समज हरवलेल्या स्त्रीयांची गोष्ट स्त्रिया एकमेकींना समजून घेण्यात इतक्या अपयशी का ठरतात? स्त्री ही भावनांनी समृद्ध असते, संवेदनशील असते, दुसऱ्यांच्या वेदना सहज ओळखू शकते मात्र इतकी भावनिक समज असलेली स्त्री अनेकदा दुसऱ्या स्त्रीलाच समजून घेण्यात कमी पडते. स्त्रियांच्या नात्यांमध्ये गैरसमज, तुलना, टोमणे, स्पर्धा आणि एक अदृश्य भावनिक अंतर इतकं का दिसून येतं? हा प्रश्न अनाकलनीय वाटत असला तरी त्याचं उत्तर आपल्या समाजव्यवस्थेत, कुटुंब व्यवस्थेत दडलेले आहे. माणूस हा सामाजिक प्राणी आहे असं म्हटलं जातं. मात्र माणसातील भेदभाव, द्वेष, शारिरीक, भावनिक हिंसा पाहता माणसाच्या सामाजिक असण्यात कुठेही तथ्य दिसून येत नाही. माणसाने माणसाला एकमेकापासून तोडण्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व करून ठेवले आहे. जातीभेद, वर्णभेद , वर्गभेद ,धर्मभेद लिंगभेद, हे ठळक दिसून येतात. दिसून न येणारे भेद हे फक्त सासू–सून किंवा दोन स्त्रियांच्या वैयक्तिक मतभेदांपुरतं मर्यादित नाही. तर ते समाजाच्या मानसिकतेशी, स्त्रीच्या संगोपनाशी, तिच्य...