भुलाबाई उत्सव : लोक परंपरेतील स्त्रीशक्तीचा जागर.
महाराष्ट्र म्हटला की डोळ्यांसमोर गणेशोत्सवाचा उत्साह, नवरात्रीचा जल्लोष , भक्तीमय वारी उभी राहते. मात्र, याच महाराष्ट्राच्या विदर्भ , मराठवाडा व खानदेश परिसरात एक वेगळीच, गोड आणि हळवी लोकपरंपरा पिढ्यान्पिढ्या जपली जात आहे. या परंपरेचे नाव आहे भुलाबाई उत्सव. पश्चिम महाराष्ट्रात भोंडला किंवा हादगा या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या उत्सवाशी भुलाबाईच्या परंपरेचे सांस्कृतिक साम्य आहे. मुलींचा सामूहिक खेळ, पारंपरिक लोकगीते, फेर धरून केलेले गायन आणि खिरापतीचा आनंद यांमधून हा उत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहत नाही, तर लोकसंस्कृतीचे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतो. भुलाबाई म्हणजे केवळ एक सण नाही, तर स्त्रियांच्या सामूहिक आनंदाचा, सर्जनशीलतेचा आणि लोकपरंपरेचा सुंदर आविष्कार आहे. भुलाबाई म्हणजे कोण? जाणून घ्या लोककथा भुलाबाईला माता पार्वतीचे रूप मानले जाते. तिच्यासोबत भुलोजी म्हणजे भगवान शंकर , बाळरूपातील गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे . या उत्सवामागे शिव पार्वतीची लोककथा सांगितली जाते ती अशी, एकदा कैलासावर भगवा...