पोस्ट्स

मरिआई लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भाग ४ : निऋतीचे अलक्ष्मी आणि ज्येष्ठा मध्ये झालेले रूपांतर

इमेज
भाग ४ : निर्ऋतीचे अलक्ष्मी आणि ज्येष्ठा मध्ये झालेले रूपांतर  शरद पाटील यांच्या मांडणीच्या अनुषंगाने निर्ऋतीला समजून घ्यायचे असेल तर तिला देवतांच्या यादीतून काढून उत्पादनपद्धतीच्या चौकटीत आणावे लागते. ती आकाशातली देवता नाही, ती शेतातली देवता आहे. तिचे रूप बदलले कारण जमिनीचा मालक बदलला. तिचे नाव बदलले कारण सत्तेचा वर्ग बदलला. वैदिक ऋचांमध्ये तिला भूम्या: अधिपत्नी म्हटले आहे. म्हणजे भूमीची मालकीण. मालकीण हा शब्द महत्त्वाचा आहे. ती भूमीवर राहणारी नाही, ती भूमीची मालकीण आहे. ज्या समाजात भूमीची मालकी स्त्रीकडे होती, जिथे कुळ आईकडून चालायचे, जिथे शेती हे मुख्य उत्पादन होते, त्या मातृकुलांची ती अधिष्ठात्री होती. नंतर याच मालकिणीला अलक्ष्मी आणि ज्येष्ठा म्हणून का हिणवले गेले? याचा अर्थ देवतांच्या भांडणात नाही, जमिनीच्या भांडणात आहे. अलक्ष्मी म्हणजे काय? यज्ञसत्ताक पशुपालकांसाठी लक्ष्मी म्हणजे काय? त्यांची संपत्ती कशात होती? गाय, घोडा, रथ आणि यज्ञातून मिळणारे दान-दक्षिणेचे धन. जो समाज गुरांचे कळप घेऊन फिरतो, जो यज्ञ करून राजसत्ता मिळवतो, त्याच्यासाठी हीच लक्ष्मी. हीच त्याची समृद...