द स्टोनिंग ऑफ सोराया एम : स्त्रीशोषण, पुरुषसत्ता आणि माणुसकीचा खून
.... आणि पहिला दगड तिच्या पित्याने मारला चार-पाच दिवसांपूर्वी एक चित्रपट पाहण्यात आला. तो ‘द स्टोनिंग ऑफ सोराया एम’ हा चित्रपट होता. यात एका स्त्रीला तिचा नवरा तिच्या चारित्र्यावर संशय घेतो, त्यामुळे सगळा समाज एकत्र येऊन सगळ्यांनी दगड मारून मारून तिला मृत्युदंड दिला जातो. त्यात पहिला दगड तिचा पिता मारतो. अशी ती एक सत्य कहाणी आहे. ‘द स्टोनिंग ऑफ सोराया एम’ हा चित्रपट केवळ एका स्त्रीला दगड मारून ठार केल्याची कथा नाही, तर निरापराध जीवावर होत असलेल्या अन्यायाला मान्यता देणाऱ्या पुरुषसत्ताक मानसिकतेचा पर्दाफाश करतो. सोरायाची कहाणी आपल्याला सांगते की स्त्रीशोषणाची सुरुवात पुरुषाच्या क्षुल्लक स्वार्थापासून होते. आणि त्याचं जालीम शस्त्र म्हणजे स्त्रीचं चारित्र्य संशयाच्या भोवऱ्यात उभे करणे. अशा वेळी पुरुषाच्या शब्दाला पुराव्याशिवाय सत्य मानले जाते आणि स्त्रीच्या अस्तित्वालाच गुन्हा ठरवले जाते, तेव्हा अन्यायाला नैतिकतेचा मुखवटा मिळतो. गुन्हा नवऱ्याचा, शिक्षा बायकोला १९८६ मधील इराणच्या एका गावात घडलेल्या घटनेवर आधारित हा चित्रपट सोराया नावाच्या स्त्रीची शोकांतिका म...