पोस्ट्स

मैत्री लेबलसह पोस्ट दाखवत आहे

🐇बोल्ट्याच्या करामती🐇 चलेजाव !! भाग१६

इमेज
               घरात बोल्ट्याचा एक अलिखित नियम होता. जो सगळ्यांना माहित  होता - त्याच्या खोलीत, म्हणजेच त्याच्या राज्यात कोणीही आलेलं त्याला आवडत नसायचं.  आम्ही त्याच्या या स्वभावामुळेच अजून एक  नाव ठेवलं होतं 'नसाना' नसाना म्हणजे काय? तर ज्याला आपल्या आसपास दुसऱ्या कुणाचं अस्तित्वच सहन होत नाही. तो राजा आणि आम्ही त्याच्या राज्यातले भाडेकरू, अशीच आमची गत होती. त्याच्या खोलीतलं एक टाचणं जरी इकडचं तिकडं झालं तरी त्याचा दिवस खराब व्हायचा. आम्हीही त्याच्या या नसानेपणाची आता सवय करून घेतली होती.  या नसानेपणाचा अजून एक किस्सा असा आहे की आठवला तरी आजही हसू येते . मात्र त्याची निरागसता मनाला भुरळ घालणारी होती     माझी मुलगी कॉलेजच्या सुट्टीसाठी घरी आली होती. घरात उत्साह, गडबड. पण आमच्या बोल्ट्याच्या कपाळावर मात्र आठ्या. त्याला ही नवीन पाहुणी अजिबात पसंत नव्हती. त्याच्या लेखी ती त्याच्या साम्राज्यावर आक्रमण करायला आली होती.      पहिल्या दिवशी ती सहज त्याच्या खोलीत गेली. आणि काय सांगू! बोल्ट्याने जणू य...