पोस्ट्स

शरद पाटील लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भाग- ५ : लोकदेवतांमध्ये जिवंत असलेली आदिमाता निऋती - शरद पाटील यांच्या अनुषंगाने.

इमेज
लोकदेवतांमध्ये जिवंत असलेली निर्ऋती :  शरद पाटील यांच्या अनुषंगाने    लोकदेवतांमध्ये जिवंत असलेली निर्ऋती : शरद पाटील यांच्या अनुषंगाने “वैदिक देवता अमर आहेत असे सांगितले जाते, कारण त्यांना मंदिरात सुरक्षित ठेवल्या आहेत. मंदिरं त्यांना जिवंत ठेवण्यासाठी तयार केली गेली आहेत. आणि लोकदेवता लोकमनात, लोकजीवनात, शेतात, बांधावर, माणसांच्या घामात जिवंत आहेत.” — शरद पाटील वेदात एक मंत्र येतो, “निर्ऋतिं अहं परावहामि” — मी निर्ऋतीला दूर घालवतो. पुरूष सत्तेला वाटले मंत्र म्हटला की निर्ऋती संपेल. पण ती आदिमाता मंत्राने मरत नाही. तिला सत्तेने मारण्याचा प्रयत्न केला, मात्र ती लोकांच्या जगण्यात व्यापून आहे. कारण ती बहुजनांचं मूळ अस्तित्व आहे. ब्राह्मणी व्यवस्थेने निर्ऋतीला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. तिला अशुभ, काळी, राक्षसी ठरवले. दक्षिण दिशेच्या कोपऱ्यात, स्मशानात ढकलले. तिला वेदातून हद्दपार केले. पण ती मेली नाही. ती जिथे वेद पोहोचत नाहीत तिथे पोहोचली. आज तीच प्रत्येक गावाच्या वेशीवर उभी आहे. शेताच्या बांधावर उभी आहे.  ती यल्लमा, मरीआई, सटवाई, एकविरा, म्हसोबा अशी नावं...

भाग २ : ऋत विरुद्ध निऋती - वैचारिक संघर्ष व सत्ता संघर्ष

इमेज
भाग २ : ऋत विरुद्ध निऋती - वैचारिक संघर्ष सत्ता संघर्ष  वैदिक वाङ्मयाचा अभ्यास करताना ‘ऋत’ ही संकल्पना केंद्रस्थानी येते. ऋत म्हणजे केवळ सत्य किंवा धर्म नव्हे, तर संपूर्ण विश्वाला धारण करणारी एक व्यवस्था. सूर्याने वेळेवर उगवणे, ऋतूंचे चक्र नियमितपणे फिरणे, नद्यांनी आपला मार्ग न सोडणे, यज्ञ योग्य पद्धतीने पार पडणे आणि समाजातील प्रत्येक वर्णाने आपले कर्तव्य पाळणे म्हणजे ऋत होय. ऋग्वेदामध्ये वरुण हा ऋताचा रक्षक मानला जातो. तो आकाशातून सर्व जगावर लक्ष ठेवतो आणि जो कोणी ऋताचे उल्लंघन करेल त्याला शिक्षा करतो. या अर्थाने ऋत ही एक दैवी, नैसर्गिक आणि नैतिक व्यवस्था म्हणून सादर केली जाते. पण या व्यवस्थेच्या नेमक्या विरुद्ध टोकाला उभी केली जाते ती म्हणजे निऋती. शब्दाच्या व्युत्पत्तीचा विचार केला तर ‘निर् + ऋती’ म्हणजे ऋताचा अभाव, ऋतापासून दूर जाणे, ऋताचा नाश. त्यामुळे निऋती म्हणजे अराजक, अनियम, असत्य आणि विनाश. जिथे ऋत आहे तिथे समृद्धी, सुव्यवस्था आणि शांती आहे, आणि जिथे निऋती आहे तिथे दुष्काळ, मृत्यू, रोगराई आणि भय आहे, असे चित्र वैदिक साहित्यात उभे केले जाते. अथर्ववेदात तर निऋती...

निऋती : मातृसत्ताक आदिमाता - भाग १

इमेज
निऋती : मातृसत्ताक आदिमाता - भाग १ भारतीय प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करताना आपण अनेक देवता, संकल्पना आणि प्रतीकांच्या भोवऱ्यात अडकतो. या देवता केवळ धार्मिक श्रद्धेच्या चौकटीत निर्माण झालेल्या नसून, त्या त्या काळातील समाजरचना, सत्ता-संबंध, आर्थिक व्यवस्था आणि सांस्कृतिक संघर्ष यांचे प्रतीक असतात. निऋती ही त्यातीलच एक महत्त्वाची, पण दीर्घकाळ दुर्लक्षित आणि चुकीच्या अर्थाने समजली गेलेली संकल्पना आहे. निऋतीचा उल्लेख वैदिक वाङ्मयात प्रामुख्याने अशुभ, विनाशकारी, संकटदायी आणि टाळण्याजोगी शक्ती म्हणून केला जातो. ऋग्वेद, अथर्ववेद आणि ब्राह्मणग्रंथांमध्ये निऋती ही अशी सत्ता मानली जाते की जिच्यापासून दूर राहावे, जिला यज्ञांद्वारे शांत करावे किंवा जिला प्रतीकात्मकरीत्या समाजाच्या सीमेबाहेर हाकलावे. तिचे नाव उच्चारताना भीती, अनिश्चितता आणि अपशकुन यांची छाया दिसून येते. मात्र प्रश्न असा आहे की, एखादी देवता इतकी भयकारी का ठरवली गेली? ती सुरुवातीपासूनच अशुभ होती, की तिला अशुभ ठरवण्यात आले? धर्मग्रंथ हे केवळ अध्यात्मिक उपदेशांचे संकलन नसतात. ते त्या समाजाच्या सामूहिक स्मृतीचे, संघर्षांचे आणि...