पोस्ट्स

शिक्षण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

डोंगरगवतासारखी मुलं | मराठी कविता

इमेज
पुर्वापार चालत आलेल्या दारिद्र्यचा खड्डा बुजवता बुजवता मेटाकुटीला आलेल्या बापाकडून जास्तीच्या अपेक्षा न ठेवता आपल्या भविष्याचं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन उर फुटेस्तोवर धावतात ही   मुलं बापजाद्याकडून आलेली गडगंज संपत्ती शिफारस पत्र लाखोंच्या शिकवण्या असं काहीच नसतं त्यांच्याकडे मुजोर पैसेवाल्यांशी स्पर्धा करीत असताना हातपाय गाळून बसतात तेव्हा आई पाजते महामानवाच्या संघर्षाचा एखादा डोस अन् डोंगर माथ्यावरच्या गवता सारखे पुन्हा जोम धरून चालू लागतात ही मुलं अनेक अडचणींना तोंड देत पोहचतात अंतिम टप्प्यात जिथे कुठलाही भेद नाही अशा भ्रमात असताना जातियतेचे सुळे अचानक वार करून घेतात बळी अजून एखाद्या " पायलचा " ©®छाया बेले