पोस्ट्स

ससा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बोल्ट्या : आनंददायी सहवास

इमेज
बोल्ट्या : एका मुक्या जीवाचा आनंददायी सहवास  बोल्ट्या -  मायाळू,  खूर.. खूर.. जीव बोल्ट्या फक्त आगाऊ, खडूस, हावरट, खुरखुर करणारा आणि ओरखडे काढणारा असाच नव्हता. त्याच्या स्वभावाच्या या सगळ्या खोडकर छटांपलीकडे तो एक अतिशय प्रेमळ, खेळकर, दयाळू आणि संवेदनशील जीव होता. त्याच्यात एक निरागस बालपण होतं, मायेचा ओलावा सामावलेला होता. त्याला बोलता येत नव्हतं, मात्र त्याच्या वागण्यातून तो जे काही सांगायचा, ते समजून घेण्यासाठी शब्दांची गरजच नव्हती. बोल्ट्याच्या दिवसाची सुरुवातच मुळी त्याच्या मित्राला उठवण्यापासून व्हायची. सकाळ झाली की त्याला त्याच्या बास्केटमधून बाहेर काढताच तो टुन्नकन उडी मारुन पळत सुटायचा आणि प्रतीक झोपलेल्या बेडवर उड्या मारायचा प्रयत्न करायचा. तीन-चार प्रयत्नात तो वर जाण्यात यशस्वी व्हायचा. स्वतःच्या खाण्यापिण्यापेक्षाही आधी आपल्या मित्राची आठवण यायची. तो सरळ त्याच्याजवळ जायचा. आधी त्याच्या भोवती गोल-गोल फिरायचा. जणू काही, 'उठी उठी गोपाळा' किंवा 'जागो पप्पू प्यारे' नाही तर मग 'सुबह हो गयी मामू' असं काही तरी तो नक्कीच म्हणत असावा. श...

🐇 बोल्ट्याच्या करामती 🐇 ये मेरा इलाक़ा है !!भाग -११

इमेज
       बोल्ट्याचा  सिंहासनासाठी निकराचा लढा बोल्ट्याचं एक तत्व होतं - _या घरात मी एकटाच राजा._ दुसऱ्या कोणाचीही त्याला अजिबात गरज नव्हती, आणि कोणाचंही या घरात येणं त्याला मान्य नव्हतं काही कारणामुळे थम्परला परत नेऊन सोडावं लागलं. घरात एकदम शांतता. बोल्ट्या आता एकटा पडेल, त्याला करमणार नाही, अशी आम्हाला काळजी वाटायला लागली. माणसांचं हृदय बघा, सशालाही एकटं वाटेल असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही एका महा-भयंकर चुकीचा निर्णय घेतला. बोल्ट्यासाठी एक 'दोस्त' आणायचा. नवीन दोस्त आणला तर खरंच दोस्तासारखा नव्हता, पैलवानासारखा होता. बोल्ट्याच्या दुप्पट आकार, धष्टपुष्ट शरीर, अगदी शुभ्र पांढरा रंग, अंगावर मेंढीसारखी मऊमऊ दाट फर, आणि एकदम शांत, सज्जन वाटणारा चेहरा. आम्हाला वाटलं, आता काय, दोघं मिळून घरभर पळतील, खेळतील, मस्ती करतील. घरात दोन ससे असतील तर किती छान दिसेल! पण आम्ही एक गोष्ट विसरलो होतो. नवीन आणलेला पाहुणा सुद्धा Male होता. आणि आमचा हा 'मेलं' सुद्धा... मग काय, झालंच वेगळं! जसा आम्ही त्या शुभ्र पैलवानाला बोल्ट्याच्या खोलीत सोडला, क्षणाचाही विलंब न करता बोल...