पोस्ट्स

स्त्री लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कवितेचे शिर्षक : इतिहास

इमेज
तुझ्या जगण्याचे संदर्भ सगळंच तर उलट लटकवलं गेलंय तुझ्या सृजन शक्तीलाच फासलाय काळीमा  तूच वाढवू शकतेस गर्भात अंकुर आणि घालू शकतेस एक नवा जीव जन्माला या वरदानालाच चढवलाय पपाचा रंग अन तुझ्या जन्मदात्या योनीला ठरवून टाकलयं पापाचं महाद्वार  तुही स्वीकारलंस निमूटपणे सगळं चालते आहेस त्याच जुनाट मळलेल्या वाटांवरून नवसृजनासाठी उलथापालथ जरुरी असते हेच विसरलीस जणू घालावा लागेल नांगर या जुनाट वाटांवरून तुलाच करावं लागेल उत्खनन तुझ्या मातृ संस्कृतीच्या शोधासाठी  अन करावं लागेल सृजन समानतेचं  तेव्हाच येईल प्रकाश तुझ्याही वाट्याला     -©®छाया बेले