कविता - अपरिचित वास्तू
अपरिचित वास्तू शहराच्या घनघोर गर्दीपासून काहीशा अंतरावर उभ्या असलेल्या त्या अपरिचित वास्तुविषयी बोलत असतात लोक काहीबाही त्यांनी न पाहिलेले तिथले दिवस , तिथल्या रात्री तिथले प्रहर, तिथले क्षण या विषयी बांधत असतात नुसतेच अंदाज अन रचतात अख्यायिका आपल्या मेंदूतील किडे सोडत जातात त्या वास्तूच्या अस्तित्वावर.. ती मात्र उभी असते निश्चल निष्पर्ण वृक्षासारखी आपली सुख दुःख आपले सनातन भोग आपल्यातच सामावून घेत अंगणातल्या पिंपळवृक्षावरील कावळ्यांची काव काव मात्र येत असते अधूनमधून तिच्याही कानावर.. @ छाया बेले.