पोस्ट्स

social life लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सामाजिक सहजीवनासाठी स्त्री-पुरुष यांच्यात निकोप संवाद आवश्यक!!

इमेज
सामाजिक सहजीवनासाठी स्त्री-पुरुष यांच्यात निकोप संवाद आवश्यक.            आमच्या शेजारी दोन तीन घराच्या नंतर एक कुटुंब राहत होतं. त्या महिलेला चार मुली व एक मुलगा.अर्थात मुलगा सर्वात लहान होता. त्याच वंशाच्या दिव्याची वाट बघत चार मुलींचा जन्म झाला असावा. नवरा पोलिसात. मोठी मुलगी आठवीत असताना नवरा दारूमुळे मरण पावला. दारूचं आणि कुटूंबाचा खर्च  यात  तुटपुंजा पगारातून मागे काहीही उरलेलं नव्हतं. मोठ्या मुलीला राणीला आठवी नंतर शिक्षण सोडावं लागलेलं. अतिशय वाईट अवस्था होती. काही महिन्यांनंतर पोलिस भरती निघाली व त्या आठवी पास राणीने सर्व पात्रता परीक्षा पास करून पोलिसात भरती झाली. तेव्हा आठवी नववी पास पोलीसात भरती केले जात असायचे.  या मुलीने घराचा कायापालट केला. घरात समृध्दी आणली. राणीच्या प्रयत्नाने भावाला वडिलांच्या जागेवर नोकरी मिळाली दुसऱ्या दोन बहिणींना पोलिसात भरती केले. एका बहिणीला  चित्रकलेत आवड होती त्यामुळे तिला त्यात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले.  आतापर्यंत जे दारिद्रय होतं दिसत होतं ते राणीनं पुसून टाकलं. ती सगळ्या...