कधीकाळी शब्दांनाही मोल होतं



कधीकाळी शब्दांना मोल होतं 

प्राणाइतकचं

शब्द जीवाला जामीन व्हायचे

शब्द सत्याचा आमीन राहायचे
आज शब्द हरवून बसलेत स्वत्व
तकलादू झालेत शब्द
शब्द तोडले जातात
शब्द मोडले जातात
शब्द फिरवले जातात
शब्द जिरवले जातात
शब्द रंगवले जातात वेगवेगळ्या रंगात
शब्द उधळतात हिंसा
वाऱ्याच्या मुखावर
दांभिकांचा तोंडी रुळता रुळता
शब्दही धारण करत आहेत मुखवटे
शब्दाला नाहीच आता स्वत्व
शब्द गमावून बसलेत
शब्दांच शब्द असणं

-©®छाया बेले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .