अस्वस्थ काळाच्या तुकड्यावर
काळाच्या अस्वस्थ
तुकड्यावर
शोधतेय एक
अदीम गुहा
जिथे घेता येईल
चिर निद्रा
गौतमाच्या निर्वाणा
सारखी
जिवलगाने करावी
दगाबाजी
अगदी तसे
कोणी वळवलेत
वेदनांचे असंख्य
प्रवाह ह्रदयाकडे
शापित अश्वत्थाम्या
सारखे
हे अमरत्वाचे क्षण
उःशाप देवून
कोणतरी
घ्यावेत परत
धरेने करावेत
आपले कनवाळू हात
पुढे
अन् घ्यावा
सामावून
आपल्यात
हा बाईपणाचा
बंदिस्त जन्म
उद्या तिच्याच उदरातून
उगवून येईन
एखादा पिंपळ वृक्ष
होवून
किंवा घेईन जन्म
पाखराचा
आभाळभर उडणाऱ्या
©®छाया बेले 🖋
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा