तिने नाही रचल्या...
तिने नाही रचल्या
कधीच
आत्मप्रौढिच्या
स्म्रुत्या , श्रुत्या
ती नाही देत वेगवेगळ्या
अवयवातून
मुलांना जन्म क्षणात
ती वाढवते
आपला अंश
आपल्या गर्भात
आपल्या श्वासावर
अन् देते जन्म प्राणांशी खेळून
ती करत नाही कुठलाच भेदभाव
आपल्या अस्तित्वावर
ती वाढू देते त्याला
आढवं तिढवं
मन मानेल तसं
आपल्या जगण्याचं
खतपाणी घालते
त्याच्या मुळाशी
नाहीच घेत
कसलच श्रेय कधीच
तो मात्र जाऊन मिळतो
तिची मुळं खोदणाऱ्या गटात
वाढ होताच !!
©®छाया बेले🖋
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा