बोधीसत्व | मराठी कविता
हे,
बोधीसत्वा..
गावकुसाबाहेर जन्म घेऊन
उजळून टाकलं
अवघं जग..
मानवतेला दिलात
नव्याने जिवदान
तुमच्या स्पर्शाने
चवदार तळ्याला
उलगडले
पवित्रतेचे अर्थ
तुमच्या पदस्पर्शाने
प्रकाशित झाल्या
अनेक अंधार वाटा
तुम्हीच शब्द..
तुम्ही वाचा झालात
मुक्या जिवा़ंची
तुम्ही भाषा झालात
निद्रिस्त मेंदूतून पेरल्या
प्रश्नांच्या ओंजळी
दाखवलात मार्ग ही
उत्तराचा तुम्हीच
आम्ही चालत आहोत
अंधाराला
भगदाड पाडत
सुर्याच्या दिशेने
तुमच्याच वाटेवरून!!
©® छाया बेले ✒
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा