आभाळाने द्यावं मोक्षाचं दान | मराठी कविता
दुआ
नोंद घ्यावी लागते मला
माझ्याच असण्याची
ह्रदयावर हात ठेवून
सुप्तावस्थेत असलेल्या
जगण्याला यावेत
हिरवे कोंब तरारून
पळत सुटावेत
वाऱ्या सोबत
काटेसावरीच्या
बियांसारखे
हलके होवून
उतरावीत सत्यात
पहाटेची स्वप्ने
एवढ्याच साठी
देहाच्या पिंजऱ्यात
अडकून पडलेल्या
श्वासांना
द्यावं आभाळानं
मोक्षाचं दान
अव्यक्ताच्या मार्गावर
जन्म साफल्याचं
तेवढं असावं
गाठीशी !!
©®छाया बेले🖋
---
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा