मनाच्या बेसॉल्टवरील पाषाण विश्व | मराठी कविता
मनाच्या बेसॉल्टवरील पाषाण विश्व
मी माझ्यात
एक विश्व सामावून आहे
एक पाषाण विश्व
तू गायिलेल्या सुराने
थरथरले होते
कालच्या विध्वंसतून
निर्माण झालेल्या
बेसाल्ट मधे काही तरी
आतून येईल वर
एखादा
पाण्याचा गार झरा
की तप्त लावा...
मनाचं उध्वस्त कलिंग
शोध घेत आहे
चिर शांती देणाऱ्या
बुद्धाचा
त्याच्या करूणामयी डोळ्यातून
वाहणाऱ्या करुणेने
फुलून यावेत खडकावर
जीवनाचे अंकुर
सुप्तावस्थेत असलेलेल्या
अश्वत्थामी इच्छेखातर !!
©®छाया बेले✒
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा