तू दिसतेस मला/ #poem

मराठी कविता .. 

तू दिसतेस मला....

तू दिसतेस मला मंदिराबाहेरच नेहमी
तुझ्या वाट्याला आलेला 
दिवस अंगावर घेऊन
जगत असतेस, 
तुझ्यावर लादलेल्या
सक्तमजुरीची शिक्षा भोगत
अनवाणी पायानं, 
मोळीसाठी भटकत असतेस
रानावनात
कधी पाठीवर तान्ह बांधून,
खडी वाहून नेत असतेस ,
भर उन्हात
पोटाची आग विझविण्यासाठी,
करतेस सुर्याच्या आगीवर मात
तू दिसतेस कोपऱ्यावर 
भाजी विकताना
विना सावलीची
घामानं थबथबलेलं 
तुझं तेजाळ रूप
अजूनच दिसतं मोहक
त्यावर रोखलेले असतात
अनेक विंचवाचे
डंख भरलेले डोळे
हॅपी होमच्या भिंतीआड
विस्कटलेलं आयुष्य सावरताना
आपल्याच तप्त श्वासात 
होरपळत असतेस खोलवर
आतल्याआत
तू बसस्टॉपच्या 
प्लॅटफॉर्मवर बसलेली
घरादारानं टाकलेली
रंग उडालेल्या 
जुनेरा सारखा चेहरा
सृष्टीच कारुण्य
तुझ्या डोळ्यात उतरलेलं
तू दिसतेस मला मंदिराबाहेरच नेहमी


छाया बेले , नांदेड.

* परिवर्तनाचा वाटसरू मधे प्रकाशित.

Translation : 

I always see you.......


I always see you outside the temple.
Living with courage, accepting the day that comes to you.
Serving the life sentence that has been awarded to you without guilt.
With naked feet you wander collecting woods in jungles,
With baby tied to back,
You carry stone metals in hot sun,
To satiate the heat of hunger
You beat the heat of Sun.
I see you at the corner,
Selling vegetables without any shelter,
Face full of sweat 
Seems more beautiful 
And many scorpions look 
With obsessed eyes.
You burn in your hot breath
Ordering the scattered life 
Behind the walls of HAPPY HOME
I see you
On the Bus Stop platforms
You look like a thrown old cloth
With colourless face and mercy eyes.
The mercy of the world has taken shelter in your eyes...
I see always see you
Outside the temple.

©️®️Chhaya Bele
Translated by :
Dr .Dhananjay Deolakar

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .