देहबेडी - मराठी कविता
पडणार आहेस या देहबेड्यात
अवयवांतील बदल सोडले तर
तूही माणूसच आहेस
तुझ्यातही आहे शक्यता
बुद्ध होण्याची
मग-
तुझे मोजमाप,
तुझी साडी,
तुझे उभार
बॅकलेस ब्लॉऊज
तुझे ओठ , लिपस्टिक
भिरभिरती नजर
का व्हावी याचीच चर्चा जास्त
का ठरावीस चवचाल तू
त्याच्या मैफिलीत
देहाचं सौंदर्य खुलून दिसावं
या साठी जागरूक असणारी तू
माणसाला माणूसपण बहाल
करणाऱ्या
तुझ्या कवटीत असलेल्या
अवयवाची
कधी करतेस का मशागत
बदलावेत ऋतू येत्या हंगामाचे
म्हणून बांधलस का संधान
नव्या रूजवणूकीचं
आयुष्याच्या माळरानावर
कधी पेरून पाहीलंस का
उजेडाचं रोप
तुझं बळ, तुझी गुणवत्ता
तू नव्याने
तपासून पहायला हवी
"बाई"च्या देहाची शिडी न लावता
उठून उभी रहायला हवी !!
@ छाया बेले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा