अण्णा भाऊ | मराठी कविता

बोलू काही 

त्या विचारी आभाळावर
जर जमले तर बोलू काही
शब्दांमधले अर्थ त्यांच्या
उलगडले तर बोलू काही

वाद नको,ती नको भांडणे
भिंतीमध्ये नको कोंडणे
विचारातील सुंदरता ती
सापडली तर बोलू काही 

अशा जयंत्या उत्सवांना
अर्थ असतोच कुठे तसा
त्या उंचीशी धागाआतला
जर जुळला तर बोलू काही 

सगळ्यांना जमते कुठे ते
आयुष्याचा दाह सोसणे
कळले जर सुर्याचे जगणे
तर किरणांवर बोलू काही 

@छाया बेले .


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .