अहं ब्रम्हास्मि | मराठी कविता

अहं ब्रह्मास्मि... !!
अहं ब्रह्मास्मि म्हणत 
किती फुगवून घेतो
माणूस स्वतःला
गोष्टीतील बेडकाप्रमाणे

दूरून डोंगर बुटका दिसतो
आणि जवळ गेल्यावर माणूस 
माणूस ही जवळ गेल्यावर 
डोंगरांसारखाच 
उंच उंच 
होत गेला असता तर ..

आजुबाजुला कोणी नसताना 
स्वतःलाच टाचणी टोचून 
काढायला हवी सगळी हवा..
स्वतःच्या जवळ 
खूप जवळ जाऊन 
बघायला हवं अधूनमधून 

खाली अगदी खाली 
अहं च्या  पायाशी
खुरटलेल्या माणसाला 
हात देऊन 
वर उचलायला हवं
जगावेगळं असं काही 
त्याच्यातच सापडेल 
सापडलं तर...
स्वतःची हत्या करण्याचा 
निर्दयपणा करायला हवा 
एकदातरी...!!

@छाया बेले .








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .