प्रसाद बन पुरस्काराच्या निमित्ताने

सुखद अनुभव!!

बन प्रतिष्ठान या वर्षी आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. 
 या निमित्ताने मी पुरस्कारावेळी लिहिलेला माझा अनुभव शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. बन प्रतिष्ठानचे कार्य अखंडपणे चालत राहो .या रौप्य महोत्सवास खूप खूप शुभेच्छा देते . 

प्रसाद बन पुरस्काराच्या निमित्ताने...

प्रसाद बन पुरस्कार मिळणं हा त्या साहित्यकृतीचा व ज्यांना मिळाला त्यांचा खरोखरच गौरव वाढविणारा आहे, हे आतापर्यंत ऐकून होते. त्यामागे अनेक कारणे आहेत. हा पुरस्कार लिखाणचा दर्जा , त्या त्या व्यक्तीचे त्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य बघून दिला जातो. 
         हॅपी होमच्या भिंतीआड या संग्रहाला मिळालेल्या प्रसाद बन ग्रंथ गौरव पुरस्कार-२०२४ निमित्ताने वरील गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव आला. 
नेहमीप्रमाणे साहित्याच्या जाणकारापर्यंत पुस्तक पोहचावे या उद्देशाने संग्रह पाठवून दिलेले. माझा लिखाण, वाचन याच्याशी संबंध असला तरी साहित्यक्षेत्राशी फारसा संबंध नाही. व्यक्त होणं ही माझी गरज आहे. माझं लिखाण म्हणजे भवतालावर कधी प्रतिक्रिया तर कधी प्रतिसाद देणं असतं. ते मी जमेल तसं करत राहते.
   सर्व जेष्ठ साहित्यिकांबद्दल मनोमन आदर आहे . तरीही फार कमी साहित्यिकांशी प्रत्यक्षात भेट झालेली आहे. त्यामुळे आपल्याला कोणी ओळखत असेल किंवा कोणताही पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा वगैरे मी ठेवत नाही. (सध्याच्या परिस्थितीतीनुसार )
एक दिवस काही तरी कामासाठी ईमेल ओपन केला आणि जेष्ठ साहित्यिक डॉ.सुरेश सावंत सरांचा मेसेज आलेला दिसला. 
 ' तुमचा हॅपी होमच्या भिंतीआड कविता संग्रह वाचाला आणि तो मला अतिशय आवडला त्यावर आपला नंबर चुकीचा दिलेला आहे . या नंबरवर संपर्क करा' मेसेजच्या खली सरांनी त्यांचा नंबर दिला होता . डॉ . सावंत सरांसारख्या जेष्ठ साहित्यिकाने माझ्या कवितेचं कौतुक करणं हा  कवितेला मिळालेला पुरस्कारच!!  
     पुरस्कार जाहीर झाल्याचे कळविण्यासाठी 
मा.डॉ अच्युत बन सरांनी फोन केला कवितेचं तोंडभरून कौतुक केलं. 
  कविता खूप आवडल्याचं सांगितलं . नंतर पत्रिकेसोबत डॉ.अच्युत बन सरांचे दोन ग्रंथही पाठवले होते त्यावरील परिचय वाचला तेव्हा कळले की त्यांच्या नावावर मराठी १४ हिंदी २ असे तब्बल १६ ग्रंथ आहेत. 
' वृक्ष जेवढा मोठा असतो तेवढ्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात या म्हणीचा अर्थ डॉ . अच्युत बन सर व डॉ. सुरेश सावंत सर 
या दोन व्यक्तीमत्वाकडे बघून कळला.
     २२-३-२५ या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात हा अतिशय  सुंदर रितीने साहित्य साहित्यिक यांचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला . आदर्श असा हा सोहळा होता . एका परिवारातील सदस्य   साहित्याचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत असेच काहीसे वातावरण होते. आपुलकी, प्रेम, सन्मान हे सगळं या ठिकाणी अनुभवास आले. 
जेष्ठ पत्रकार अभिनेते साहित्यिक मा .विजय कुवळेकर 
मा.महेश कोठावळे सरांना ऐकणं हा सुखद अनुभव होता. 
एक भाकर तीन चुली या कादंबरीतचे लेखक देवा झिंजाड व इतर पुरस्कार विजेते साहित्यिक यांनाही ऐकता आले. त्या त्या लेखकाची लेखनामागची भुमिका कळली .
अनेक अनुभवी जेष्ठ साहित्यिक उपस्थित होते.
 जेष्ठ साहित्यिका डॉ. मथू सावंत मॅडम , डॉ.वर्षा बन मॅडम यांच्याशी हृदय संवाद झाला..
' हॅपी होमच्या भिंतीआड ' या संग्रहालची पाठराखण करणारे मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ जगदीश कदम सर उपस्थित असल्याचा विशेष आनंद झाला.
 त्याच बरोबर डॉ संजय कसाब, डॉ. विजयकुमार माहुरे, डॉ मंदाकिनी माहुरे, प्रा. मेघा ढवळे, कवयित्री सुमन जिरोणेकर , डॉ जिरोणेकर ही आपुलकीची माणसं यावेळी उपस्थित असल्याने आनंद द्विगुणित झाला.
 माझी मुलं प्रा.प्रतिक, सोनाली, यादव , तेजस  
यावेळी उपस्थित होती याहून मोठा आनंद अजून कोणता असू शकतो....!!

छाया बेले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .