द्वंद्वात मी .. / कविता

द्वंद्वात मी 

डोळे बंद
 करून घेतले तर
आपल्याच मेंदुतील 
उजेडाचे पुंजके
नाचत राहतात
डोळ्यासमोर

डोळे उघडताच
आजूबाजूला 
तोच गडद काळोख 
आपल्या अस्तित्वाला
व्यापून
काळोखी हास्य
करीत उभा

कळत नाही
डोळे मिटून
उजेडाचे
पुंजके बघत 
त्याच भासात
हरवून जावं

कि डोळे उघडून
अंधार व्हावं

माझ्यातला गौतम 
चौकट लांधायला
तत्पर
तर माझ्यातील
यशोधरेने आपल्या
पायातच चौकटीचं
रोपण केलेलं..
 गौतम फडफडत
राहतो
पंख छाटलेल्या 
पाखरागत

@छाया

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .