आईच्या फोनमुळे तुटताहेत मुलींचे संसार | मराठी लेख

 

'आईच्या फोनमुळे तुटताहेत मुलींचे संसार .'

या हेडिंगवर नजर स्थिरावली, ती घरंगळत भुतकाळात गेली. 
"लगीन झालेल्या लेकीनं नांदून नाव करावं, न्हाय तर मरुन नाव करावं.तुह्या मायचा लाड ह्हय सगळा."
 तुफानलेल्या मिशातून बाहेर पडलेले शब्द आणि विहरीत तरंगलेले मायीचं मढं डोळ्यात तरंगलं.  घरं सगळी बारव दिसू लागली. आत वेगवेगळ्या रंगांची मढी..
तिनं फोन घेतला. ढगाळलेल्या डोळ्यातून अंधूक दिसणारा लेकीचा नंबर दाबला..
" जीवा, तुला मरणाशिवाय कोन्ताच दरवाजा उघडा दिसत नसल तर निघून ये , मी हय इथं. सगळ्या मिश्याशी लढीन. अजून एक सांगते , लगन झालेल्या लेकीनं नांदून नाव करावं पण आपली शान आणि आपला प्राण सांभाळून..!!" 

छाया बेले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .