साहित्य सम्राट अण्णाभाऊ: जीवन आणि कार्य
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती - लोकशाहीराला विनम्र अभिवादन आज साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती. केवळ एक लेखक, कवी, शाहीर म्हणून नव्हे तर शोषित, वंचित, उपेक्षित समाजाचा बुलंद आवाज म्हणून अण्णाभाऊंचे नाव महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील लाल बावटा अण्णाभाऊंनी लालबावटा कलापथकाच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी अतिशय मोलाचे योगदान दिले. शाहिरी, पोवाडे, लोकनाट्याच्या माध्यमातून त्यांनी गावोगावी जाऊन मराठी माणसाला जागृत केले. "माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली" हे गीत असो की संयुक्त महाराष्ट्राचा लढा - अण्णाभाऊंचा आवाज हा जनतेचा आवाज होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हा विचार त्यांनी लोकांच्या मनामनात भिनवला. समाजातील अनिष्ट रूढींवर प्रहार अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीतून समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यावर कठोर वार केले. त्याच बरोबर जनसामान्यांच्या जगण्याच्या प्रश्नांना, त्यांच्या वेदनेला वाचा फोडली. म्हणूनच ते लोकनायक, लोक...