पोस्ट्स

आधुनिक स्त्री लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सुशिक्षित कमावत्या स्त्रीशी जुळवून घेण्यासाठी समाज तयार आहे का?

इमेज
सुशिक्षित कमावत्या स्त्रीशी जुळवून घेण्यासाठी समाज तयार आहे का?           काळाचं चाक सतत फिरतं असतं. त्याच्या या प्रवासात जीवसृष्टीच्या सर्वच स्तरावर   अनेक बदल घडून येत असतात. असं म्हणतात की एकेकाळी महाकाय असलेले डायनासोर आज पालीच्या रूपात भिंतीवर सरपटताहेत.  असा हा काळाचा महिमा आहे. हे बदल मानवी जीवनात सुद्धा घडत असतात. कधीकाळी माणूस जंगलाचा भाग होता. बाईचं जननी , पालन पोषणकर्ती म्हणून आदरणीय होती.  त्यामुळे म्होरकेपण बाईच्या हाती होते. ते तिने तिच्यात असलेल्या मातृवृत्तीनुसार सांभाळले.  काळाच्या ऋतू बदलात पुढे हेच म्होरकेपण  बाप्यांच्या हाती आहे. त्यांनी त्यांच्या वृत्ती नुसार शोषण व्यवस्था प्रस्थापित केली. महिलांना पाळीव प्राण्यांच्या समांतर जीवन जगायला भाग पाडलं. आजचा काळ पुन्हा स्त्री जीवनाशी संबंधित  नवे बदल घेऊन दाराशी उभा आहे. मात्र हे बदल पेलण्यासाठी आपला समाज तयार आहे का?        आजच्या स्त्रीया शिक्षण घेऊन , पैसे कमवत आहेत, त्यांना स्वतःची मतं आहेत. ते  त्या स्पष्टपणे मांडत आहेत....