पोस्ट्स

आर्थिक स्वावलंबन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

साम्राज्ञी ते गुलाम: स्त्रीच्या अधोगतीचा प्रवास| भाग दोन | मराठी लेख

इमेज
पुढे स्त्रीचे जीवन अतिशय कठीण होत गेले. तिला वर निवडीचा अधिकार राहिला नाही. बालविवाह, लहान मुलींचे वयस्कर पुरुषांशी लग्न करून देण्यात येऊ लागले. त्यामुळे तरुण वयात मुली विधवा होत. त्यांना सांभाळण्याची तयारी माहेरच्यांची किंवा सासरच्या मंडळीचीही नसायची. स्त्रीचा पुनर्विवाह ही संकल्पना अस्तित्वातच नव्हती. या कारणांमुळे सतीप्रथा सुरू झाली. पतीच्या निधनानंतर तिची इच्छा नसतानाही जबरदस्तीने सरणावर बसवून हत्या करण्यात येत होती. त्या प्रथेचे उदात्तीकरण करण्यात आले व तिची मरणानंतर सती म्हणून पूजा करण्यात येऊ लागली. आजन्म अपमान सहन करीत जगण्यापेक्षा मेल्यावर तरी मान मिळावा, या इच्छेखातर काही बायका सतीच्या नावाने आत्महत्या करायला तयार होत असाव्यात. समाजात हुंडापद्धती रूढ झाली. तिला प्रतिष्ठा देऊन समाजमनावर रुजवले गेले. ही अनिष्ट प्रथा आजही भारतीय समाजात एक मोठी समस्या बनून राहिली आहे. लहानपणी पित्याच्या अधिकारात, तरुणपणी नवऱ्याच्या अखत्यारीत, म्हातारपणी मुलाच्या धाकात जिणे जगावे लागे व आजही ही परंपरा कायम आहे. मुलांवर पित्याचा अधिकार असल्याने मुलगी अर्भकाला जिवंत ठेवायचे की नाही, हे प...