समाजातील व्यसनाधीनता व त्यात होरपळणारे स्त्री जीवन
समाजातील व्यसनाधीनता व त्यात होरपळणारे स्त्री जीवन नुकत्याच जाहीर झालेल्या इंजिनिअरिंगच्या देश पातळीवर परिक्षेच्या निकालात एक मुलगा देशात सातवा आला. आता अनेक मुलं येत असतात यात काय नवल असं वाटू शकतं. याचं वेगळेपण असं की, या मुलाच्या घरची परिस्थिती अतिशय हालाखीची. हातावरचं पोट. त्यातच वडिलांना दारूचं भयंकर व्यसन. या मुलाची आई मोलमजुरी करून दोन मुलं, नवरा,सासू सासरे एवढ्यांचं पोट भरत होती. घरात सतत भांडणं. अशा परिस्थितीत ही मुलं शिकतील असा विचारही मनात येणं शक्य नाही. चार वर्षांपूर्वी या मुलाचे वडील एक दिवस दारू पिऊन मरून पडले. तेव्हापासून हे कुटुंब कसं आहे याची माहिती नव्हती. मात्र अचानक आज या मुलाने देशात रॅंक काढला. आणि आश्चर्याचा धक्का बसला. वडील असते तर तो हे यश कदाचित मिळवू शकला नसता असा विचार मनात येऊन गेला ( खरं तर असा विचार मनात यायला नको होता) कारण व्यसनाधीन झालेली माणसं त्यांच्या सहवासातील लोकांना विकासासाठी संधीच देत नाहीत. तेवढा वेळ मिळू देत नाहीत. ते...