पोस्ट्स

छत्रपती शिवाजी महाराज लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मां साहेब : मराठी कविता

इमेज
मां साहेब मनोगत :  मां साहेब तुम्ही होता म्हणून.       मी जेव्हा जिजाऊ माँ साहेबांचा विचार करते, तेव्हा मला त्या फक्त शिवरायांच्या आई वाटत नाहीत. त्या मला पहिल्या स्त्री-गुरू वाटतात, पहिल्या क्रांतिकारी विचारवंत वाटतात. ज्या काळात स्त्रीला स्वतःचं नावही नव्हतं, त्या काळात एका माऊलीने आपल्या गर्भात   स्वराज्याचं स्वप्न पोसलं. अंधार युग संपविणारा सूर्य पोसला.  हा विचारच मला थक्क करतो.  आज आपण मुलांना काय संस्कार देतो? मोठा हो, नोकरी कर, पैसा कमव. पण जिजाऊंनी काय सांगितलं? "शिवबा, रयतेचे राज्य आण." आपलं नाही, रयतेचं. आणि दुसरा मंत्र, "परस्त्री मातेसमान जाण." आज स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी आपण किती कायदे करतो, पण एका आईने दिलेला हा एकच संस्कार जर प्रत्येक मुलाने पाळला, तर एकही कायदा करायची गरज पडणार नाही. म्हणूनच मी या कवितेत म्हटलंय, विषमतेचं कुंदाड काढलं खणून. शिवरायांनी फक्त परकीय शत्रूशी लढा दिला नाही, तर जाती-भेद, विषमता या आतल्या शत्रूंशीही लढा दिला. सर्व जाती धर्माचे लोक त्यांचे जीवाला जीव देणारे मावळे होते.  आणि हे बीज त्यांच...