पोस्ट्स

जीवन विचार लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मानसिक शांती कशी मिळवावी? कबीराच्या एका दोह्यात दडलंय उत्तर

इमेज
मानसिक शांती  कशी मिळवावी? - जेव्हा धावणं थांबतं तेव्हांच मानसिक शांती अनुभवास येते. मनाच्या अशांततेवर कबीराचा एक सुंदर व समर्पक दोहा आहे-  जग में बैरी कोई नहीं, जो मन शीतल होय। या आपा को डारि दे, दया करे सब कोय॥  अशांत मनापेक्षा मोठा शत्रू जगात दुसरा कोणीही नाही, अस्थिर अशांत माणसाला मन सर्वात जास्त त्रास देतं‌. शांत विकार रहित मन असेल तर आनंद प्राप्ती होते. कारण अशा व्यक्तीशी सगळेजण प्रेमाने वागतात असं कबीर म्हणतात. आणि हे आपणही बघत असतो. अनुभवत असतो. मात्र मनाची शांती टिकविणे खरोखरच खूप अवघड काम आहे, हेही तितकेच खरे आहे.      आपल्याला लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली जाते की, धावत राहायचं. पहिला नंबर आणण्यासाठी , चांगली नोकरी मिळवण्यासाठी , लोकांपेक्षा पुढे जाण्यासाठी धावत रहायचं.  या धावण्यात आपण इतके गुंतून जातो की आपण कुठे चाललोय हेच विसरून जातो. मग एक दिवस अचानक लक्षात येते की आपण खूप थकलोय. एक पाऊलही पुढे टाकणं शक्य नाही इतकं थकलोय.   मग मनात प्रश्न येतो - हे सगळं कशासाठी? सगळं मिळवलं तरी समाधान का नाही? आणि कधी कधी नेमका तिथ...