दत्तू मास्तर : काटेरी बेट झालेल्या जगात माणुसकी रुजवणारी कादंबरी |पुस्तक परिचय
दत्तू मास्तर : काटेरी बेट झालेल्या जगात माणुसकी रुजवणारी कादंबरी |पुस्तक परिचय हल्ली माणसाच्या आत्मकेंद्रीपणने कळस गाठला आहे. मी आणि माझं याशिवाय माणसाला काही दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक माणूस हा काटेरी बेट होत चालला आहे. या आत्मकेंद्री पणामुळे मानवी मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. या कारणाने समाजात पराकोटीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. हे जरी आजच्या समाजाचं वास्तव असलं तरी काही माणसं स्वार्थ बाजूला ठेवून संताचे, महामानवांचे मानवकल्याणाचे विचार कुठलाही गाजावाजा न करता आपल्या कृतीतून जगत असतात व समाजात रूजवत असतात. आपल्या आजूबाजूचे जग सुंदर समृद्ध करण्यासाठी अहोरात्र झटत असतात. मानवते प्रति अपार करूणा असलेल्या मास्तरची कहाणी योगीराज वाघमारे यांच्या "दत्तू मास्तर" या कादंबरीचा विषय आहे. यशोदीप प्रकाशना कडून अलिकडेच प्रकाशित झालेली योगिराज वाघमारे यांची ही कादंबरी महत्त्वाची जीवनमूल्य घेऊन वाचकासमोर आली आहे. योगिराज वाघमारे साहित्यविश्वातील मानदंड आहेत अस मत पाठराखण करताना प्रकाशिका प्राध्य...