पोस्ट्स

दासप्रथा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आधुनिक दास्याची रूपं (भाग-२)

इमेज
आधुनिक दास्याची रूपं (भाग-२)                    आजची दासप्रथा भूतकाळातील साखळदंड, बाजारपेठा आणि उघड गुलामगिरीसारखी स्पष्टपणे दिसत नाही. तीने आपलं स्वरूप बदलले आहे. ती आता  रूपाने सूक्ष्म, स्वरूपाने अदृश्य, प्रभावाने अधिक खोलवर गेलेली आहे. आधुनिक समाजात स्त्रीला उघडपणे कैद केलेलं नसतं, पण तिच्या आयुष्याभोवती अशा मर्यादा विणल्या जातात की तिचं स्वातंत्र्य अपूर्ण राहतं.  म्हणूनच या आधुनिक दास्याची ओळख होणं,  ती पटवणं कठीण आहे . कारण ती दैनंदिन जीवनात इतकी मिसळलेली आहे की,  ती अनेकदा नैसर्गिक वाटू लागते.      या ' दास्याची' रचना समजून घेण्यासाठी तिच्या तीन महत्त्वाच्या स्तरांकडे पाहणं आवश्यक आहे.रचनात्मक, सांस्कृतिक आणि मानसिक. हे तीन स्तर वेगवेगळे नसून एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एकत्रितपणे स्त्रीच्या आयुष्यावर प्रभाव टाकतात. रचनात्मक (संरचनात्मक) असमानता : व्यवस्थेतील अदृश्य भिंती रचनात्मक असमानता म्हणजे समाजातील संस्था, नियम आणि व्यवस्था ज्या पद्धतीने कार्य करतात, त्यात ही  विषमता, असमानत...