कविता: नव्याने तुटणं | मराठी कविता
Date: Nov 25, 2019 प्रत्येक क्षणात नांत बांधण्याची नव्याने सुरुवात क्षणाच्या शेवटी पुन्हा त्याचं नव्याने तुटणं कितीही लक्तरलं तरीही टाक्यापुरती जागा शोधून माझां सांधण्याचा प्रयत्न त्याचं धागा सोडून मोकळं होतं जाणं उमेदीच्या पायावर हतबलतेच्या कळस पुन्हा पुन्हा चढत राहणं आयुष्याच्या पोळ्यात एखादा मधाचा कण साठवण्यासाठी माझा अविरत प्रयत्न त्याचं पोळंच ओरबाडून फेकून देणं दोघांनाही जणू झिंग चढलीय एकाला जोडण्याची एकाला तोडण्याची !! छाया बेले.