कविता: नव्याने तुटणं | मराठी कविता

Date: Nov 25, 2019


प्रत्येक क्षणात
नांत बांधण्याची
नव्याने सुरुवात
क्षणाच्या शेवटी पुन्हा
त्याचं नव्याने तुटणं

कितीही लक्तरलं तरीही
टाक्यापुरती जागा शोधून
 माझां सांधण्याचा प्रयत्न 
त्याचं धागा सोडून मोकळं
होतं जाणं

उमेदीच्या पायावर 
हतबलतेच्या कळस
पुन्हा पुन्हा चढत राहणं

आयुष्याच्या पोळ्यात
एखादा मधाचा कण
साठवण्यासाठी माझा
अविरत प्रयत्न
त्याचं पोळंच 
ओरबाडून फेकून देणं

   दोघांनाही जणू झिंग चढलीय
एकाला जोडण्याची
एकाला तोडण्याची !!

छाया बेले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .