पोस्ट्स

साहित्य लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वारी : भक्ती, समता मानवतेची शाळा | मराठी लेख

इमेज
 वारी : भक्ती, समता  मानवतेची शाळा  " जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया..."       वारकरी संप्रदायातील हा भावस्पर्शी स्वर केवळ अभंगातील शब्द नाही; तो लाखो वारकऱ्यांच्या अंतःकरणातील ओढ आहे. आपल्या विठू माउलीच्या दर्शनासाठी अनवाणी पायांनी चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर ते त्याचे माहेर आहे. म्हणूनच दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक टाळ-मृदंगाच्या निनादात, अभंगांच्या गजरात आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या अखंड जयघोषात पंढरीची वाट धरतात. संसाराचा गाडा ओढून दमलेल्या जीवावरचं सगळं ओझं उतरवून ठेवून मुक्तीची पताका खांद्यावर घेऊन पंढरिच्या वाटेवरून पावलं धावत सुटतात.     त्याच बरोबर सामाजिक दृष्टीने विचार केला तर, पंढरीची वारी ही केवळ धार्मिक यात्रा, किंवा उत्सव नाही; तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाचा आत्मा आहे.   शेकडो वर्ष सुरू असलेल्या वारीत संतांच्या विचारांचा अमूल्य वारसा, समतेची शिकवण, शि...

हां बुरी हूं मैं | हिंदी कविता

इमेज
हां  बुरी हूं मैं  खुद के साथ साथ  कईयों को  डसा है मैंने सच के ज़हर से  न मतलब से प्यार , न मतलब के लिए वार करती हूं   बुरी हूं मैं  बस प्रेम की चाह प्रेम की पनाह  दिल का सुकून ,  यही आरामगाह  इसी सपने पे लुटा दिया खुद को  बुरी हूं मैं  चल पड़ी उसी राह पर जहां प्रेम लिखा था  चलती रही बरसों तक मगर राह की भी तो कुछ ख्वाहिशे थी   जो उठा न पायी बोझ  मेरा या मेरे सपने का  थककर कर बैठ गई  बुरी हूं ही मैं  आंखों का समंदर भी सच था हर दुःख भी सच था  एहसास भी सच थे हल्के में नहीं लिया  मैंने जीवन को इसलिए लगा दिया  इसके हर एक पल के लिए  खुद को दांव पर.. हार गयी हर बार  हां मगर नाज है खुदपर  मुकम्मल हैं फिर भी वजूद मेरा  तुम्हारी नज़रों में भले ही  बुरी हूं मैं। @छाया.

मानवी शोषणाविरुद्धचा करुण आक्रोश - हार्ट लॅम्प | बुकर पुरस्कार विजेता कथासंग्रह

इमेज
मानवी शोषणाविरुद्धचा करुण आक्रोश - हार्ट लॅम्प | बुकर पुरस्कार विजेता कथासंग्रह  लेखिका बानू मुश्ताक यांच्या ‘हार्ट लॅम्प’ या कथा संग्रहाला बुकर पुरस्काराने गौरवण्यात आले, ही भारतीय भाषांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार एका स्त्री लेखिकेला मिळावा, हे त्याहूनही अधिक अभिमानास्पद आहे. लेखिका बानू मुश्ताक यांचे हार्दिक अभिनंदन! या कथा संग्रहात स्त्री जीवनाची अतिशय बारकाईने आणि तेवढ्याच संवेदनशीलतेने चिकित्सक मांडणी केलेली आहे. साहित्य हा मानवी जीवनाचा आरसा आहे, असे म्हटले जाते. त्या आरशातील प्रतिबिंब हे समोर उभ्या केलेल्या चित्रावर अवलंबून असते. ते चित्र जेवढे अस्सल असेल, तेवढे प्रतिबिंबही स्पष्ट असेल, हेही तितकेच खरे. समाज, जात, धर्म हे त्या व्यक्तीच्या ‘स्व’ अस्तित्वानंतर येते. लेखिकेने समस्त स्त्री ‘स्व’ चे जगणे, तिचे शोषण, नात्यातील खोटारडेपणा, तिच्याप्रतीचे सामाजिक दंभ, मानवी व्यवहार, वृत्ती हे सगळे धीटपणे मांडले आहे. ‘कुठेही गेलं तरी पळसाला पानं तीनच’ - ‘हार्ट लॅम्प’ वाचत असताना या म्हणीचा प्रत्यय घडोघडी येतो.  शाहिस्ता महालासाठी संगमरवरी लादी : पह...

रचनाच्या कवितेचे रसग्रहण !!

इमेज
रचना यांच्या कवितेचे रसग्रहण !! सकाळी सकाळी गुलाबजलची बाटली साफ करण्यासाठी सवयीनं लिक्विड सोप ओतलं प्रत्येक बाटली साफ करताना वापरतात तसं अन काळजात चर्रर्र झालं ... गुलाबाच्या मंद सुगंध  मिटविण्यासाठी रसायनाचा वापर अगदी खूप सारं प्रेमाच चॅट  डिलीट फॉर एव्हरीवन किंवा क्लिअर चॅट  केल्यासारखं गुलाबाचा सुगंध संपूर्णतः मिटवण्याचा प्रयत्न ... इतके कृतघ्न आपण स्वतःचा आत्मा  डिजीटल करून घेताना नैसर्गिक गुलाबी सुगंध कायमचा निकालात काढत सेंद्रियत्व हरवून आम्ही होतोय रासायनिक  मुळासकट साफ करत व्हाईट कॉलर क्लिअर  अन डिजिटल एका क्लिकवर  माणसा सकट सारंच डिलीट करत भावनाशून्य होत ... करतोय का आम्ही आमचं जगणं सुकर की होतोय  दिवसेंदिवस मनोरूग्ण ... 🖍️ रचना दि. १६ / ७ / २०२४         सध्याचा काळ हा एवढ्या वेगाने धावतोय की बघून उर दडपून जातो . या पंचवीस वर्षांत म्हणजे मोबाईल फोन आल्यानंतर त्याचे  मानवी जीवनावर झालेले परिणाम कवयित्री रचनाने अगदी अचूकपणे टिपले आहेत . आपण मुकाटपणे सोसत  असलेलं दुखणं कोणीतरी लक्षात आणून देतं ते...

लोककवी श्रीनिवास मस्केच्या कवितेवरील रसग्रहण!!

इमेज
टिचल्या मातीला आभाळ देऊ ……………………… सावल्या उन्हाळल्यात  चल थोडा विसावा घेऊ  खूप कोलाहल आत  टिचल्या मातीला आभाळ देऊ  पोटऱ्यात कणीस भरलं ही नव्हतं नीट शेरडामागं फिरणारे पाय  बांधले खुट्याला  वेलीवरचं फुल गळून पडलं चूल ..शेत.. गोठा ..नदी  आता साथीला… चल थोडं माथ्यावर  दूरून गाव बघू  घर घर घर नुस्ती घरघर आरसा ही बोलत नाही  चेहऱ्यावर घामाची पाहून वल  परकलातल्या दोन वेण्या हरवल्या परक्या घरी सांगल कुणाला सल कोंडलेल्या श्वासाला चल मोकळा वारा देऊ…. ना पोर्णिमेचा चंद्र आला  कसली काय चंद्रमिठी  जागलीला शेतात तो  घरात हिरमुसलेली वटी ताटात भरीत अण् धरलेल्या सटी चल मोकळ्या आभाळाला  एक रात्र देऊ …. दगदगीत जिंदगी आली काठला लेकरांच्या स्वप्नातच जीव गुंतला खळखळणाऱ्या झऱ्याची लय  हिंदडण्या आधीच नदी झाली  चल थोडं ढग होऊन पुन्हा कोसळू  खूप कोलाहल आत  टिचल्या मातीला आभाळ देऊ … @श्रीनिवास सहज सुचलेले..       कविता ही एक सुंदर अभिव्यक्ती आणि गंभीर कृती आहे . कवी विश्वात्मा होवून सृष्टीच्या ...

हम हिंदुस्तानी #humhindustani

इमेज
           मेरे देश के वीर जवान भाइयों को मेरा कृतज्ञता से भरा शत-शत नमन ये कहानी वैसे तो काल्पनिक है, लेकिन हर वीर जवान की वीरता को दर्शाती है। यह मेरे देश के हर एक वीर जवान की कहानी है। ये कहानी उन वीरों को समर्पित है, जिन्होंने देश की आन-बान-शान के लिए अपनी जान तक को हँसते-हँसते न्योछावर कर दिया। भारत भूमि की ये धरती संतों की, महापुरुषों की, वीरों की पावन धरती है। इस मिट्टी में कई महापुरुषों ने जन्म लिया और अपने कार्य से भारत देश की मिट्टी को गौरवान्वित कर दिया। जब-जब इस देश पर जरा सी आंच आई, तब-तब देश के वीरों ने अपनी जान की बाजी लगा दी। अपने माँ की ममता, बाप का साया, बहन की राखी, बच्चों का भविष्य, पत्नी का सिंदूर, महबूबा के सपने सब तिरंगे में लिपटाकर देश को भेंट चढ़ा दिए। ऐसे ही एक वीर की कहानी हम आपको बताने जा रहे हैं, जिसके शौर्य ने भारत देश का सीना चौड़ा कर दिया। जिसकी शहादत ने हर एक भारतवासी की आँखें नम कर दी। महाराष्ट्र संतों की और शूर वीरों की भूमि है। कई महापुरुषों ने इस मिट्टी में जन्म लिया है, अपने कार्य से इस भूमि को गौरवान्वित कि...

स्त्री जाणिवा व स्त्री संवेदन : आकलन !!

इमेज
महात्मा फुले माय सावित्री यांच्या कार्यातून जी क्रांतीची सुरुवात झाली आणि समाजमन ढवळून निघाले. फुले युग ते आतापर्यंतचा काळ या  अंतरात भारतीय समाजाने अनेक स्थित्यंतरे पाहिली. देशाचे स्वातंत्र्य. डॉक्टर बाबासाहेबांनी चालविलेली मानवमुक्तिची चळवळ. घटनेतून महामानवाने दिलेले न्याय व समतेचे अधिकार. शिक्षण क्षेत्राच्या रुंदावलेल्या कक्षा. जागतिकीकरण यातून विदेशी संस्कृतीचे झालेली तोंडओळख. शिक्षणामुळे स्त्रियांचं  जागृत झालेलं आत्मभान. याच आत्मभानातून स्त्रिया लिहू लागल्या. आपलं जगणं, भोगणं, दु:ख , घुसमट, संघर्ष,  साहित्यातून मांडू लागल्या. 'स्व' च्या जाणिवेतून  मनात कोहम् चा उमटलेल स्वर, त्यांच्या साहित्यातून न उमटला तरच नवल !!  आपल्या लोकशाही समाजव्यवस्थेत आजही स्त्रियांना पारंपारिक साच्यात घट्ट बांधलेलं आहे. नव्हे तर संपूर्ण जगात कमी अधिक प्रमाणात ही परिस्थिती पहायला मिळते. कॅट मिलेट या लेखिकेने सेक्शुअल पॉलिटिक्स (१९७७) या ग्रंथांमध्ये अशी भूमिका मांडली आहे की, पितृसत्ताक व्यवस्था हीच  स्त्रियांच्या शोषणाचे अदिकारण आहे.      या साच्यात...

साहित्य सूर्य अण्णाभाऊ साठे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व | पुस्तक परिचय

इमेज
साहित्य सूर्य अण्णा भाऊ साठे - कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व : अभिप्राय साहित्य सूर्य अण्णा भाऊ साठे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व हा ग्रंथ हाती येऊन बरेच दिवस झाले. ग्रंथ वाचून झाला तरी या श्रेष्ठ कलाकृतीवर कसं आणि काय लिहावं याच विवंचनेत होते. लिहिल्याशिवाय राहवलंही नाही. थोडक्यात जमेल तसा मी माझा अभिप्राय नोंदवला आहे. हा ग्रंथ वाचणंच एक पर्वणी आहे. उत्खनन करून भूईच्या गर्भातून अनभिज्ञ असलेल्या गोष्टी बाहेर काढाव्यात तसं सुरेश पाटोळे यांनी अण्णा भाऊंचे प्रकाशित व अप्रकाशित साहित्य, जीवन याचे उत्खनन करून अमूल्य असा ठेवा वाचका हाती दिला आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे या महामानवावर लिहिणं किंवा बोलणं म्हणजे सूर्यासमोर पणती धरावी असं आहे. अण्णा भाऊंची प्रतिभा त्यांचं कर्तृत्व जगमान्य आहे. अण्णा भाऊंना वाचून त्यातील आपल्या कुवतीनुसार काय घेता येईल ते प्रत्येकाने घ्यायला हवे. आणि प्रत्येकासाठी त्यात खूप काही घेण्यासारखं आहे. अण्णा भाऊंना वाचत असताना किंवा कोणत्याही साहित्यिकाला वाचत असताना वाचकाचा दृष्टिकोन जसा आहे त्या अनुषंगाने अर्थ लावण्याची शक्यता असते. कोणा एका चष्म्यातून कलाकृ...

गोष्ट छोटी लाख मोलाची | आत्मपरीक्षण करायला लावणारा लेख

इमेज
     जबाबदारीची जाणीव आपल्या मुलांना आपण कायम आपल्यापेक्षा लहानच समजत असतो. किंवा नवीन पिढी बेजबाबदार असं बोलल्या जातं. मात्र ती आपल्या पेक्षा खूप मोठी आणि जबाबदार झाल्याचा प्रत्यय एखाद्या घटनेतून येतो. असाच एक अनुभव मलाही आला. सगळी कामं आटोपून मी एका ऐप वर एक गाणं गुणगुणत होते. संगिंतासह गाण्याचे बोल उपलब्ध असल्याने आपल्याला आवडणारं गाणं आपण शेवटपर्यंत म्हणू शकतो. त्यातला काही भाग जरी मुळ गाण्यासारखा आला तरी ते खूप सुखद वाटतं. असंच एक मला आवडणारं लतादीदीच गाणं गुणगुणत होते. तो जवळच बसून होता. मधून मधून काही तरी बोलत होता. मी त्याला हातानेच दोन मिनिटे थांब असं सांगून मी माझ्या गाण्यावर लक्ष केंद्रित केलं. मधेच त्याने व्यत्यय आणल्यामुळे चिडले पण होते. या क्षणात जी वेळ आहे. किंवा जे काही आहे ते फक्त माझं आहे. त्यात कोणाचीही भागिदारी मला मान्य नव्हती. त्यामुळे मी कुणाचही काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. तो काही तरी बोलत होता. आणि मी दुर्लक्ष करून मी माझ्यात मग्न होते. शेवटी गाणं संपल्यावर चिडून म्हणाले - "हं बोल आता.. दोन मिनिटे थांब असं सांगूनही तुझं सुरूच ...

मी घडत जाताना

इमेज
    //मी घडत जाताना//      माझ जन्मगाव मराठवाड्यातील नांदेड शहरापासून बसने  दोन ते अडीच तासाच्या अंतरावर मुखेड तालुक्यात 'माकणी' हे छोटासं गाव आहे.  आज घडीला या गावची लोकसंख्या पंधराशे आहे.      डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावात सगळीकडून कोणत्याही मार्गाने गेले तरी गावाच्या जवळ गेल्याशिवाय  गाव दिसत नाही.      वेशीबाहेर दलित वस्ती, यात गावाच्या आत शिरण्याआधी सुरवातीला एक छोटा मांगवाडा लागतो. त्यानंतर मारुतीचा पार , पाराच्या नंतर त्या काळचा महारवाडा , त्यानंतर दुसरा मांगवाडा.     गावात वेशीच्या आत मराठा, हटकर या दोन जाती बहुसंख्यांक आहेत . जास्त लोकसंख्या या दोन जातीची आहे.  बाकी एक मुसलमानाचे घर हे छोट्या मांगवाड्याशेजारी मात्र गावाच्या आत आहे. याव्यतिरिक्त  कोमट्याची दोन घरं. सुताराचे एक घर, लोहाराचे एक घर.      गावातील सगळ्या लोकांकडे शेती होती.  कुणाकडे कमी- जास्त हलकी, भारी असेल पण सगळे शेतकरीच होते. छोट्या मांग वाड्यातील तसेच महारवाड्यातील लोकांकडेही शेती होती ...

कविता: नव्याने तुटणं | मराठी कविता

इमेज
Date: Nov 25, 2019 प्रत्येक क्षणात नांत बांधण्याची नव्याने सुरुवात क्षणाच्या शेवटी पुन्हा त्याचं नव्याने तुटणं कितीही लक्तरलं तरीही टाक्यापुरती जागा शोधून  माझां सांधण्याचा प्रयत्न  त्याचं धागा सोडून मोकळं होतं जाणं उमेदीच्या पायावर  हतबलतेच्या कळस पुन्हा पुन्हा चढत राहणं आयुष्याच्या पोळ्यात एखादा मधाचा कण साठवण्यासाठी माझा अविरत प्रयत्न त्याचं पोळंच  ओरबाडून फेकून देणं    दोघांनाही जणू झिंग चढलीय एकाला जोडण्याची एकाला तोडण्याची !! छाया बेले.

अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्रीवाद व इतर गुण विषेश

इमेज
अण्णा भाऊंच्या साहित्यातील स्त्री वाद व इतर विषेश गुण !! थोर विचारवंत, साहित्य सम्राट, अण्णा भाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यातील  वाटेगाव येथे झाला. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी गुन्हेगार जमात म्हणून घोषित केलेल्या मांतग समाजात या महामानवाचा जन्म झाला. खरंतर महामानवाला कुठलीच जात नसते. मात्र त्यांच्या जातीचा उल्लेख एवढ्या साठीच की आधीच हिंदू धर्माने शुद्रत्व लादून माणूसपण नाकारलेलं वरून ब्रिटिश सरकारचा गुन्हेगार जमात ठरवून केलेला कहर. या काळात मातंग समाजातील लोक  अतिशय खडतर जीवन जगत होते. दारिद्रय , अज्ञान, अंधश्रद्धा, उपासमार, रोगराई, यात हा समाज खितपत होता.       मात्र मातंग समाजातील लोक शुर होते. म्हणूनच व्यवस्थेनं त्यांच्यावर गुलामी लादून त्यांच जीवन बस्तर केलं होतं.   तरीही या लोकात स्वाभिमान होता. विरासारखं जगणं विरासारखं मरणं हे त्यांच्या रक्तात होतं.    हा क्रांतीचा वारसा घेऊन हा थोर विचारवंत जन्माला आला होता.     वयाच्या दहाव्या वर्षी अण्णा शाळेत गेले. मात्र मास्तराच्या अमानुष...